धक्कादायक; पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या कारणातून पतीने केली गळफास लावून आत्महत्या
मनोहर संभाजी कुतवळ (वय 35, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
धक्कादायक; पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या कारणातून पतीने केली गळफास लावून आत्महत्या
मनोहर संभाजी कुतवळ (वय 35, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
क्राईम; बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या कारणातून पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुतवळवाडी (ता.बारामती) येथे शनिवारी (दि. 23) पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनोहर संभाजी कुतवळ (वय 35, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात कुतळवळ यांच्या पत्नीवर औषधोपचार सुरु होते, रुग्णालयाने पैसे
भरण्यास सांगितले होते. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, त्याचा तणाव मनोहर यांच्यावर होता. त्यांनी जवळपास 4.5
लाख रुपये जमा करून करुन रुग्णालयात भरले होते, मात्र अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर आज पहाटे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
यानंतर मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी संपर्कात होते.
संबंधित रुग्णालयाला बिल कमी करण्याबाबतची प्रक्रीया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचे पाऊल उचलले. यानंतर सुनीलकुमार मुसळे यांनी ही परिस्थिती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनाही या घटनेचा धक्का बसला. त्यांनी तातडीने संबंधित रुग्णालय गाठत संबंधित महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याचे निर्देश दिले आहेत.