धनगर आरक्षणासाठी रक्त लिखित पत्रे लिहून इंदापूर येथे आंदोलन.
राज्य सरकारला जाग आणण्यासाठी समाज्यातील कार्यकर्त्यांनी केले आंदोलन.
धनगर आरक्षणासाठी रक्त लिखित पत्रे लिहून इंदापूर येथे आंदोलन.
राज्य सरकारला जाग आणण्यासाठी समाज्यातील कार्यकर्त्यांनी केले आंदोलन.
इंदापूर:-प्रतिनिधी
आज दि.13 ऑगस्ट रोजी इंदापूर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून इंदापूर तालुका धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणा देत राज्य सरकारला जाग आणण्यासाठी इंदापूर तहसील कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, शासनाने घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करून 1 हजार कोटी रुपयांची तरतूद त्वरित करण्यात यावी,मेंढपाळांवरती होणारे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांकरिता रक्तलिखित पत्रे लिहून आंदोलन करण्यात आले.
या सर्व मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार अशा आशयाचे निवेदन इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले.
यावेळी धनगर ऐक्य अभियानाचे प्रमुख डॉ.शशिकांत तरंगे,पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके,पंचायत समिती सदस्य सतिष पांढरे,रासपचे तालुकाध्यक्ष सतिष शिंगाडे,ज्ञानदेव डोंबाळे,तेजस देवकाते, दत्तात्रय पांढरे,नानासाहेब खरात,धनाजी देवकाते,पोपट पवार,महादेव पांढरे,संपत सरक,सचिन खामगळ,बापू पारेकर,तानाजी मारकड,धनाजी देवकाते,प्रविण हरणावळ यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.