इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी
गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.

इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी
गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.
क्राईम ; बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे 17 जानेवारी 2021 रोजी संजय महादेव गोरवे याचा संगनमताने खून करण्यात आला होता. खून करून त्याचे हात, पाय आणि डोके कापून भीमा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र दोघे जण फरारी होते. या दोघा जणांना पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अकलूज मध्ये पकडले.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे 17 जानेवारी रोजी दादा कांबळे याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून मंजुषा महादेव गोरवे (वय ५१ वर्षे रा.टाकळी टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर) यांचा मुलगा संजय महादेव गोरवे यास त्याचे मित्र लकी विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्या मध्यस्थीने बोलावुन घेतले व कुटुंबातील सरूबाई, सुष्मिता व काजल यांचेशी संजय याची जवळीक संबध असलेचा संशय घेवुन संगनमत करून बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत संजय यास धारधार हत्याराने जिवे मारले.
त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून कोठेतरी फेकुन देऊन मृतदेह (धड) भिमानदीच्या पात्रात त्याची ओळख पटु नये याकरीता फेकुन दिले होते. अशी फिर्याद मंजुषा गोरवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली होती त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात यापूर्वी ३ आरोपी अटक करण्यात आलेले होते. गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.
सदर गुन्हयात यापूर्वी ३ आरोपी अटक करण्यात आलेले होते. गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.
मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक १५/६/२०२१ रोजी LCB टिमला सदर गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी हे अकलूज जि.सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरुन त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे
१.अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात वय २० वर्षे
२.प्रमोद प्रताप खरात वय २१ वर्षे दोघे रा.माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर
यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे .
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पोहवा. जनार्दन शेळके,पो.ना. गुरु गायकवाड,पो.ना. अभिजित एकाशिंगे,पो.ना. राजू मोमीन,पो.ना. मंगेश थिगळे,पो.ना. अजित भुजबळ,
चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.