इंदापूर
नगरपरिषदेने कोरोना काळातील गाळे भाडे, घरपट्टी,पाणीपट्टी माफ करावी : इंदापूर एमआयएम ची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

नगरपरिषदेने कोरोना काळातील गाळे भाडे, घरपट्टी,पाणीपट्टी माफ करावी : इंदापूर एमआयएम ची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
सन २०२०-२१ ते २०२१-२२ काळातील शहरातील गाळे भाडे कमी करून नागरिकांची घरपट्टी,पाणीपट्टी इंदापूर नगरपरिषदेने माफ करावी अशा मागणीचे निवेदन गुरुवारी ( दि.५ ) इंदापूर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांकडे दिले आहे.
कोरोनाने जगाभरात थैमान घातले असल्याने नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. याकाळात नागरिकांचे व्यवसाय बुडाले असून नागरिक तारेवरची कसरत करून जीवन जगत असताना नगरपरिषदेच्या पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीमुळे नागरिक हतबल झालेले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेने गाळ्यांचे भाडे व घरपट्टी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्या इंदापूर शहरातील पद्धधिकार्यांनी केली आहे.यावेळी जावेद बशीर शेख, अख्तर मुलाणी,आझम पठाण, अलिअकबर मणेरी, खालेद कोरबु,आक्रम जहागीरदार हे उपस्थित होते.