नगरपालिकेच्या विरोधात असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशी तात्पुरते स्थगित.
घरकुला संदर्भात काम केले जाईल असे लेखी पत्र देऊन उपोषण मागे.
नगरपालिकेच्या विरोधात असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित.
घरकुला संदर्भात काम केले जाईल असे लेखी पत्र देऊन उपोषण मागे.
बारामती:वार्तापत्र
नागरिकांना विश्वासात न घेता बारामती नगरपालिकेने १८ मार्च २०२० रोजी घरकुला संदर्भात एक ठराव पास केला असून त्यास वित्तीय संमती दिली आहे. ही बाब येथील सामाजिक कार्यकर्तेेेे सचिन जगताप यांच्या निदर्शनास आल्यावरून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे तीन दिवस आमरण उपोषणास बसले होते. तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने रात्री उशिरा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. व घरकुला संदर्भात नागरिकांना विश्वासात घेतले जाईल याची खबरदारी नगरपालिका घेणार आहे. या आश्वासनावरून सदर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
बारामती शहर झोपडपट्टी विरहित करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून लाभार्थ्यांच्या याद्या ही निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबत १८ मार्च २०२० रोजी नगरपालिकेने ठराव करून वित्तीय मंजूरी दिली आहे.
मात्र हा ठराव करत असताना शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता पालिकेने परस्पर ठराव पास केला असल्याने या ठरावा विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप हे सदर ठरावाच्या विरोधात ३० जुलै पासून आमरण उपोषणास बसले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जगताप यांची प्रकृती खालावल्याची बातमी सर्वत्र पसरली व नागरिकांनी उपोषण स्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दि. १ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा उपोषणकर्ते जगताप यांची भेट घेत नागरिकांना विश्वासात घेऊन घरकुला संदर्भात काम केले जाईल असे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केल्यावरून उपोषण स्थगित करण्यात आले.