नगरपालिकेला अखेर मिळाला मुख्याधिकारी
गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू होता.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेला गेले काही महिने मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळेना म्हणून मनसेने (दि:३०) रोजी बारामती नागरपालिके समोर ” कोणी मुख्याधिकारी देता का?” आंदोलन केले होते. अखेर मनसेच्या त्या आंदोलनाला अखेर यश मिळालं.. अन पालिकेला मुख्याधिकारी मिळाला. मुख्याधिकारी मिळाले म्हणून मनसेने आज (दि:१३) रोजी नगरपरिषदेसमोर फटाके वाजवून, मोदक वाटून नवीन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत देखील केले.
बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू होता. त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी निर्माण होत होत्या. आणि जनतेला त्रास देखील सहन करावा लागत होता. कोविड काळात मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना देखील अडचण येत होत्या.
बारामतीत मुख्याधिकारी नसणं हि लाजिरवाणी बाब असल्याचे मनसे कडून त्यावेळी सांगण्यात आले होते.
बा.न.पच्या उपमुख्याधिकारी कसलीही जबाबदारी न घेता सरळ नागरिकांना सांगत होते, की तुम्ही जाऊन प्रांत साहेबांना भेटा. नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणाचा वचक नसल्याने ते पण काम टाळत होते. व मुख्याधिकारी नसल्याचे कारण पुढं करत प्रत्येक काम टाळलं जात होत.
आज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे महेश रोकडे यांनी स्विकारली.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याधिकारी पदाचा पदभार हाती स्विकारल्यानंतर रोकडे यांनी बारामती नगर परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेऊन कामास सुरुवात केली.
महेश रोकडे यांनी यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियानात प्रभावीपणे काम केले आहे. या दरम्यान शिरुर, इंदापूर, विटा याठिकाणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी काम पाहिले आहे.
बारामतीत नगरपालिकेला मुख्याधिकारी नियुक्त होण्यास विलंब का लागतो असा देखील प्रश्न लोकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर मनसेने आंदोलन देखील केले होतं. दरम्यान या आंदोलन अखेर यश प्राप्त होत पालिकेला मुख्याधिकारी मिळाला. दरम्यान पालिकेला नवीन मुख्याधिकारी मिळाले म्हणून मनसेने नगरपरिषदेसमोर फटाके वाजवून, मोदक वाटून नवीन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अॅड पोपटराव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष अॅड निलेश वाबळे, अॅड भार्गव पाटसकर, केदार चिटणीस आदींनी मुख्याधिकारी यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले.