नटराज नाट्य कला मंडळाने घेतली १०० खाटांच्या कोविड केअर सेंटरची जबाबदारी; उद्या सुरू होणार…
नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली.
१०० खाटांच्या कोविड केअर सेंटरची जबाबदारी नटराज नाट्य कला मंडळाने घेतली उद्या सुरू होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहात हे सेंटर
नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर येथील नटराज नाट्य कला मंडळाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह येथे कोविड केअर सेंटरची जबाबदारी घेतली असून आज हे सेंटर सुरू होणार आहे.
नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली. नटराज नाट्य कला मंडळ हे कोविड केअर सेंटर चे व्यवस्थापन करणार आहे. विना लक्षणाच्या रुग्णांची येथे व्यवस्था केली जाणार असून येथे शंभर रुग्ण दाखल होऊ शकतात.
प्रशासनावरील ताण हलका व्हावा व आरोग्य विभागाच्या लोकांना रुग्णांच्या तब्येतीकडे अधिकाधिक लक्ष देता यावे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरु केल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ, नगरसेविका नीता चव्हाण व मयूरी शिंदे आदी उपस्थित होते.
एकूण खोल्या- १५ रुग्ण संख्या- १०० बेड
कार्यपध्दती
१) शासकीय रुग्णालयाकडून पॉझीटीव्ह असिमटेमेटीक रुग्ण पाठविल्यावर त्यांना रुग्णवाहिकेमधून सेंटरमध्ये आणले जाईल.
२) स्वागत कक्ष – या ठिकाणी रुग्णाची नोंदणी करुन त्यांना रुम दिली जाईल. जेष्ठ रुग्ण पहिला मजला व इतर रुग्ण दुस-या मजल्यावर पाठविण्यात येईल.
डॉक्टरांचे कार्य
दररोज ३ डॉक्टर व २ नर्सेस (सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ८ व रात्री ८ ते सकाळी ८) यावेळेत उपस्थित असतील. डॉक्टरांकरीता तळमजल्यावर स्वतंत्र्य कक्ष निर्माण केलेला आहे. प्रत्येक वेळेतील डॉक्टर रुग्णाची तपासणी करुन त्यांच्या नोंदी ठेवतील व सिस्टर सकाळ -दुपार- संध्याकाळची औषधे वेळचे वेळी रुग्णांना देतील.
रुग्ण सोई
प्रत्येक रुग्णास स्वतंत्र्य बेड, गादी-उशी-सकाळचा चहा-नाष्टा-दुपारचे जेवण-रात्रीचे जेवण दिले जाईल. रुममध्ये मच्छर अगरबत्ती, काडीपेटी, मेणबत्ती, कपडा ठेवला आहे. जेवण झाल्यानंतर रुग्णाने डिस्पोजेबल ताट रुम बाहेर ठेवलेल्या डस्बीनमध्ये ठेवणेचे आहे. रुग्णास तातडीची मदत हवी असल्यास, प्रत्येक मजल्यावर इंटरकॉम फोन ठेवण्यात आला आहे. त्याव्दारे ते मदत मागू शकतील. स्वागत कक्षातील व्यक्ती त्या पुरवू शकेल. रुग्णाची दररोजची माहिती एस.एम.एस. व्दारे नातेवाईकांना दिली जाईल. दररोज वृत्तपत्र, केबल टी.व्हीची सोय केलेली आहे.
स्वागत कक्ष
यामध्ये रुग्णांची माहिती एकत्र करुन शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येईल.
तातडीची व्यवस्था –
रुग्णास जादा उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना रुग्णवाहिकेमधून सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल, रुई ग्रामीण रुग्णालय अगर मागणीप्रमाणे खाजगी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था अॅब्युलन्समार्फत केली जाईल.
स्वागत कक्ष
त्याकरीता एक अॅब्युलन्स उपलब्ध करुन ठेवली आहे.
तातडीची व्यवस्था –
रुग्णास जादा उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना रुग्णवाहिकेमधून सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल, रुई ग्रामीण रुग्णालय अगर मागणीप्रमाणे खाजगी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था अॅब्युलन्समार्फत केली जाईल. त्याकरीता एक अॅब्युलन्स उपलब्ध करुन ठेवली आहे.
स्वच्छता
रुग्णाच्या खोल्या व स्वच्छतागृह दररोज स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दररोजचा गोळा होणारा कचरा मेडीकल प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात येईल.
समन्वय
कोव्हिड केअर सेंटरची सर्व व्यवस्थापन नटराज नाट्य कला मंडळाचे कार्यकर्ते करतील. त्यांची देखील वेळाप्रमाणे उपस्थिती असेल. स्वागतकक्षात स्वतंत्र्य फोन नंबर – ८१८०९७३९४४ आहे.यावर नातेवाईकांना माहिती दिली जाईल..