महाराष्ट्र

नव्या वर्षात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार ; पाहा संपूर्ण यादी

अवघ्या काही दिवसांत देशभरातील सर्व बँका बंद होणार आहेत

नव्या वर्षात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार ; पाहा संपूर्ण यादी

अवघ्या काही दिवसांत देशभरातील सर्व बँका बंद होणार आहेत

प्रतिनिधी

नवं वर्ष सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच नव्या वर्षात बँकेचे व्यवहार करण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांबाबत जाणून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) जानेवारीमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी 2022 मध्ये देशभरातील सर्व बँका 16 दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त जानेवारीमध्ये इतर सुट्ट्यांमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

राज्यांनुसार सुट्ट्यांचं वेळापत्रक 

देशभरातील विविध राज्यांमधील सण आणि उत्सवांनुसार, सुट्ट्यांचं वेळापत्रकही वेगळं आहे. लोसोंगच्या दिवशी गंगटोकमधील सर्व बँका बंद राहतील, तसेच या दिवशी इतर राज्यांतील बँकांचे व्यवहार सुरु राहतील. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी कोलकातामध्ये बँकांना सुट्टी असेल. आरबीआयने प्रादेशिक सुट्ट्या आणि कॅलेंडरवर आधारित बँकांसाठी विविध सुट्ट्या ठेवल्या आहेत. अवघ्या काही दिवसांत देशभरातील सर्व बँका बंद होणार आहेत. मात्र, बँकांच्या सुटीच्या काळातही ऑनलाइन बँकिंग सेवा सुरु राहतील. जानेवारी 2022 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी राज्यवार आणि साप्ताहिक सुट्ट्या येथे पाहू शकता.

जानेवारी 2022 मधील राज्यवार बँकांच्या सुट्ट्यांची यादी 

  • 1 जानेवारी 2022 : नव्या वर्षाचा पहिला दिवस (देशभरात सुट्टी)
  • 3 जानेवारी 2022 : नववर्षाचा उत्सव/लोसूंग (सिक्किम)
  • 4 जानेवारी 2022 : लोसूंग (मिझोरम)
  • 11 जानेवारी 2022 : मिशनरी दिवस
  • 12 जानेवारी 2022 : स्वामी विवेकानंद यांची जयंती
  • 14 जानेवारी 2022 : मकर संक्रांत (काही राज्यांमध्ये)
  • 15 जानेवारी 2022 : पोंगल (आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू)
  • 18 जानेवारी 2022 : थाई पूसम (चेन्नई)
  • 26 जानेवारी 2022 : प्रजासत्ताक दिन (देशभरात सुट्टी)
  • 31 जानेवारी 2022 : मी-डॅम-मे-फी (आसाम)

जानेवारी 2022 मध्ये बँकांच्या आठवडी सुट्ट्या : 

  • 2 जानेवारी 2022 : रविवार
  • 8 जानेवारी 2022 : दुसरा शनिवार
  • 9 जानेवारी 2022 : रविवार
  • 16 जानेवारी 2022 : रविवार
  • 22 जानेवारी 2022 : चौथा शनिवार
  • 23 जानेवारी 2022 : रविवार
  • 30 जानेवारी 2022 : रविवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!