खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इशारा,जो कार्यकर्ता किंवा सदस्य 3 वेळा विनामास्क दिसेल त्याला तिकीटच देऊ नका
५० लाख रुपये निधीतून झालेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीच्या विजेसाठी केलेली सोलर सिस्टीम यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

इंदापूर :- बारामती वार्तापत्र
कोरोना नियमांच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार किती काटेकोरपणे वागतात हे अनेकदा दिसून आलंय. कुठल्याही कार्यक्रमात ते मास्क घालूनच सहभागी होतात. इतकंच नाही तर कुठल्या कार्यक्रमात त्यांना पुष्पगुच्छ देणाऱ्यालाही अजितदादा चांगलंच सुनावताना दिसून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजितदादा कडक शब्दात समज देतानाही पाहायला मिळाले. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना इशारा दिलाय. जो कार्यकर्ता किंवा सदस्य 3 वेळा विनामास्क दिसेल त्याला तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना दिला आहे.
सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याताली सपकळवाडी इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या कोरोना नियम पाळण्याच्या सवयीचं कौतुक केलं. अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली आला नाही. कुठल्या कारणासाठी मास्क काढावा लागला तर ते काही सेकंदात पुन्हा घालतात. अशावेळी माझी जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी दिलाय. त्याचबरोबर मागील दीड वर्ष आणि पुढील एक वर्ष पंतप्रधान मोदी यांनी आमचा खासदार निधी कापल्याचंही त्यांनी सांगितलं.