नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबीनं) कारवाई करत तब्बल 1.1 टन गांजा जप्त- समीर वानखेडे
या गांजाचं बाजारमूल्य 7 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी या कारवाईची माहिती दिली.

प्रतिनिधी
- मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा काही लोकांचा प्रयत्न – समीर वानखेडे
- समीर वानखेडे म्हणाले, इमानदारीने काम केल्यामुळे मला जेलमध्ये टाकायचं असेल तर …
समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, नांदेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. 1.1 टन गांजा पकडण्यात आला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशमधून आणण्यात आला होता. महाराष्ट्रात हा ट्रक आल्यानंतर गांजा ताब्यात घेतला गेला.
या प्रकरणी आतापर्यंत दोन लोकांना ताब्यात घेतलं गेलंय. चौकशी सुरू आहे, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
एनसीबीने एका ट्रकला थांबवून तपासणी करून तब्बल 1.1 टन गांजा जप्त केला आहे. या गांजाचे बाजारमूल्य तब्बल 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलय.
आज (15 नोव्हेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या मांजरम या गावच्या रोडवर MH26-AD-2165 या ट्रकची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत प्रत्येकी 20 किलो गांजा असलेली 43 पोती, तर 24 किलो गांजा असलेली 5 पोती एनसीबी पथकाला आढळून आली.
हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथून निघाला असून तो जळगाव इथं पोहोचवायचा असल्याची माहिती मिळाली आहे.