कोरोंना विशेष

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

तुकाराम मुंढे यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

तुकाराम मुंढे यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.­

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून क्रोणाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. याच पाश्वभूमीवर तुकाराम मुंढे हे सतत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत होते. सणांच्या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे आणि लोकांनी कमीत कमी बाहेर पडावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत होते. त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय.

Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested.

I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur.
We shall win

काय आहे ट्विट
तुकाराम मुंढे यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मला सध्या कुठलेही लक्षणं नाहीत त्यामुळे मी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या सर्व नियम मी पाळतो आहे. गेल्या १४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कृपया टेस्ट करून घ्यावी. आपण नक्की जिंकू”. असं ट्विट त्यांनी केलंय.
काही दिवसांपूर्वी नागपूरचे महापौर संदीप जोशीही गृह विलगीकरणात गेले होते. आता खुद्द आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे नागपुरातील लोकांना अधिक सर्तक राहून गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!