नागरिकांच्या आरोग्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध: अजित पवार
चौफेर विकास करताना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा तळागाळात पोचवणे हे सुद्धा म्हतपूर्ण

नागरिकांच्या आरोग्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध: अजित पवार
चौफेर विकास करताना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा तळागाळात पोचवणे हे सुद्धा म्हतपूर्ण
बारामती वार्तापत्र
कोरोना च्या महामारी मध्ये सुद्धा कोरोना बरोबरच नागरिकांना इतर आजारासाठी उत्कृष्ट वैदकीय सेवा व सुविधा वाड्या वस्त्यांवर व मोठ्या शहरात मिळाव्यात या साठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तालुक्यातील मळद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चे उदघाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते या वेळी माळेगाव कारखाना चे चेअरमन बाळासाहेब तावरे, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे,सभापती नीता फरांदे,नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,तालुका वैदकीय अधिकारी मनोज खोमणे,डॉ वैशाली देवकाते,डॉ नीलम पवार आदी उपस्तीत होते.
बारामती चा चौफेर विकास करताना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा तळागाळात पोचवणे हे सुद्धा म्हतपूर्ण असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
नितीन शेंडे यांनी प्रास्ताविक मध्ये मळद ग्रामपंच्यात रस्ता,वीज,पाणी व आरोग्य साठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी सरपंच योगेश बनसोडे,उपसरपंच किरण गावडे,सदस्य युवराज शेंडे, बजरंग पवार,विकास भोसले,सदस्या आशा लोंढे,सुनीता सातव,आशा मोहिते,सारिका पिसाळ, , व ग्रामविकास अधिकारी सुनील पवार आदींनी उपस्तितांचे स्वागत केले.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास 5 गुंठे मोफत जागा उपलब्ध करून दिल्या बदल मेहुल गुजर यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार प्रदर्शन सुनील सुभेदार यांनी केले.