नारायण राणे विनोद करतात हे माहिती नव्हतं- खा.शरद पवार
या समितीची जबाबदारी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर राज्यातील कृषी मंत्र्यांकडे दिली होती.
नारायण राणे विनोद करतात हे माहिती नव्हतं- खा.शरद पवार
या समितीची जबाबदारी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर राज्यातील कृषी मंत्र्यांकडे दिली होती.
बारामती वार्तापत्र
नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते विनोद करतात हे मला माहिती नव्हतं अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी नारायण राणे यांच्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महा विकास आघाडीचे सरकार जाईल असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते.
त्याविषयी पत्रकारांनी आज शरद पवार यांना विचारले असता त्यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याला काहीच महत्त्व नसल्याचे सांगितले. नारायण राणे यांचे वक्तव्य म्हणजे राजकारणातील विनोद आहेत त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही असे त्यांनी सांगितले.
नवीन कृषी कायद्याविषयी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की कृषी कायद्याची चर्चा 2004 मध्ये मी कृषी मंत्री असताना झाली होती. माझ्या काळात आणि आत्ताच्या सरकारच्या कामगिरीत असा फरक आहे की घटनेतील तरतुदीनुसार शेती हा राज्याचा विषय आहे. शेती कायदा राज्याने करावा त्यासाठी मी राज्यातील कृषिमंत्र्यांना बोलावून त्यांची मते घेतली व मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमली होती.
या समितीची जबाबदारी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर राज्यातील कृषी मंत्र्यांकडे दिली होती. त्या समितीने सुचवलेल्या शिफारसीनुसार मसुदा तयार झाला व तो मसुदा पुन्हा राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे विचारार्थ पाठविला गेला. यानंतर नवीन सरकार आले या सरकारने एकदम कायदा तयार केला व तो संसदेत गोंधळात मंजूर करून घेतला.
कायदा करायचा असेल तर चर्चा होणे अपेक्षित आहे राज्याशी संबंधित विषय असेल तर राज्याला अधिक विश्वासात घ्यायला पाहिजे पण मोदी सरकारने थेट कायदाच अंमलात आणला अशी माझी मुख्य तक्रार आहे. असेही शरद पवार यांनी सांगितले. मात्र चर्चेतून यावर मार्ग निघू शकतो असेही त्यांनी सांगितले.