इंदापूर

निमगाव केतकीतील शेतकऱ्यांचा बाह्यवळण रस्त्याला कडाडून विरोध

शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

निमगाव केतकीतील शेतकऱ्यांचा बाह्यवळण रस्त्याला कडाडून विरोध

शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

इंदापूर : प्रतिनिधी

संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी बाह्यवळण मध्ये जमीनी देण्यास निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून त्यांनी इंदापूर तहसीलदार कचेरी येथे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग बारामती यांच्यासमोर मंगळवारी ( दि.२७ ) समक्ष म्हणणे मांडले आहे.

चालू सरकारी रस्ता १०० फूट रुंद ( ३० मी रुंद ) आहे.चालू सरकारी रस्त्याच्या दक्षिण बाजूने जुना सरकारी रस्ता आहे.प्राधिकरणाने चालू सरकारी रस्ता ७० फूट रुंद दाखवून दिशाभूल केलेली आहे.दक्षिण बाजूने असणाऱ्या जुन्या रस्त्याचा विचार केलेला नाही.दि.१५ ऑगस्ट २०१७ रोजी बाह्यवळण करू नये असा ग्रामसभेचा झालेला ठराव प्राधिकरणास सादर केलेला आहे.गुगल अर्थ नकाशानुसार चालू सरकारी रस्ता ३६०० मीटर लांबीचा दाखविला आहे. चालू सरकारी रस्त्याचे इस्टिमेट रुपये ६७.०४ कोटी व रिअलायमेंट रस्त्याचे इस्टीमेंट रुपये ३९.८२ कोटी दाखविले आहे. यामध्ये लांबीची दिशाभूल करून इस्टिमेट कमी-अधिक दाखवून प्राधिकरणाने दिशाभूल केली आहे. परियोजना निदेशक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर जा. क्र एनएचएआय/ पीआययु/ एसएलपी/ बीएमटी- ऐकेजे/ पालखी मार्ग/ एनएच ९६५ जी/५१५६/ दि.२८ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी पुणे ( भूसंपादन ) यांनी निमगाव केतकी रिअलाईन्मेंट व चालू रस्ता याबाबत प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा अहवाल पाठवला आहे. या अहवालामध्ये निमगाव केतकी चालू रस्ता २० ते २५ मीटर रूंद आहे असे म्हटले आहे. वास्तविक पाहता सदर चालू रस्ता १०० फूट रुंद आहे.

तसेच चालू रस्त्याची रुंदी २० ते २५ मीटर दाखवून इस्टिमेट वाढवले आहे. सदर अहवाल प्राधिकरणाने चुकीचा पाठवला आहे. प्राधिकरणाने रिअलायनमेंट ( बाह्यवळण ) रस्त्याचा डीपीआर अद्यापही केलेला नाही. राष्ट्रीय राजमार्ग अधिनियम १९५६ कलम ३क चे उपकलम ( २ ) चे अधीन राहून सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देण्यात आलेला कोणताही आदेश अंतिम राहील अशी तरतूद आहे.सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग बारामती यांनी क्रमांक पा.म.मा./ भूसं / कावि / ६ / २०१८ बारामती दि.८ मार्च २०१८ रोजी बाधित होणारे शेतकरी अल्पभूधारक आहेत व मध्यम भूधारक आहेत.चालू रस्त्यावर अंडरपास करावा असा स्वयंस्पष्ट अहवाल दिला आहे. प्राधिकरणाने अधिनियमातील तरतुदीनुसार भंग करून दि.२७ मार्च २०१८ ची अधिसूचना कार्यवाहीविना रद्द करून दि.२७ जानेवारी २०२१ ची अधिसूचना जारी करून दडपशाही चालवलेली आहे.असे म्हणत वरील सर्व कारणास्तव निमगाव केतकी बाह्यवळण मार्गास जमीनी देण्यास निमगाव केतकीतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून वरील प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग ( भूसंपादन ),अधिनियम,१९५६,( १९५६ चा ४८ ) कलम ३ ( सी ) ( १ ) (२) अन्वये काढलेल्या नोटिसीला शेतकऱ्यांनी समक्ष उपस्थित राहून मंगळवारी ( दि.२७ ) म्हणणे मांडले आहे.

यावेळी सर्जेराव जाधव,ॲड.सचिन राऊत, तात्यासाहेब वडापुरे, बाबजी भोंग,संदीप भोंग,रत्नाकर बरळ,कुलदीप हेगडे,सारिका बरळ,भारत बरळ,राहुल बरळ,जनाबाई वडापुरे,आनंदी वडापुरे,कलावती वडापुरे,सुभाष वडापुरे,विठ्ठल वडापुरे यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी महिला सारिका बरळ म्हणाल्या की,आम्ही खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटलो मात्र काही तोडगा निघाला नाही आत्ता आम्हाला गळा घोटल्या सारखे वाटत आहे. आमच्या जमिनी वाचाव्यात नाहीतर आम्हाला नाईलाजाने आत्महत्या करावी लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!