निमगाव केतकी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा
अश्या ठरावामुळे निमगांव केतकी ग्रामपंचायत हुकुमशाहीच्या मार्गाकडे वळाली की काय?

निमगाव केतकी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा
अश्या ठरावामुळे निमगांव केतकी ग्रामपंचायत हुकुमशाहीच्या मार्गाकडे वळाली की काय?
निलेश भोंग प्रतिनिधी
निमगांव केतकी येथील मासिक मिटिंग मध्ये झालेल्या ठरावाची प्रत मिळण्यासाठी वारंवार मागणी करून देखील टाळाटाळ होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी निमगांव केतकी ग्रामपंचायतीस निवेदन देऊन ठरावाची प्रत न मिळाल्यास दि. 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना राऊत म्हणाले की दि. 30 जून रोजी झालेल्या मासिक मिटिंग मध्ये प्रहार जनशक्ती पक्षावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला असून तो ठराव बेकायदेशीर असून त्या ठरावाची प्रत वेळोवेळी मागणी करून देखील निमगांव केतकीचे ग्रामसेवक यांनी दिला नसून त्या ठरावाची प्रत देण्यासाठी वेळोवेळी टाळाटाळ केली जात आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाकडून वेळोवेळी विकास कामाबाबत आंदोलन, उपोषण करून कामे व्यवस्थित व निपक्षपाती करण्यासाठी आवाज उठवला होता. परंतु निमगाव केतकी येथील सत्ताधारी पक्षाकडून जाणून बुजून हा ठराव केला असून असा ठराव ग्रामपंचायतीला करण्याचा कोणताही अधिकार नाही. अश्या ठरावामुळे निमगांव केतकी ग्रामपंचायत हुकुमशाहीच्या मार्गाकडे वळाली की काय? असा सवाल निमगाव केतकी येथील सामान्य जनतेकडून केला जाऊ लागला आहे.