निमगाव केतकी चे सरपंच व गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईल ने आंदोलन करणार – संजय राऊत.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली तक्रार.

निमगाव केतकी चे सरपंच व गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईल ने आंदोलन करणार – संजय राऊत.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली तक्रार.
निमगाव केतकी ; बारामती वार्तापत्र
: गेल्या काही महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेचा विषय बनलेली ग्रामपंचायत निमगाव केतकी यांच्याविरुद्धचा आणखी एक विषय पुढे आलेला असून याबाबत थेट गटविकास अधिकारी व सरपंच यांच्या कार्याबाबत अनियमितता व संशय असल्याचे तक्रारदार संजय राऊत यांचे म्हणणे आहे त्यामुळे लवकरात लवकर तक्रारदार यांनी केलेल्या ओढ्याच्या मोजणी या विषयातील भ्रष्टाचार जनतेच्या समोर मांडावा अशी मागणी प्रहारचे संजय राऊत यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या तक्रार पत्रात प्रहार चे संजय राऊत म्हणतात की,ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी सकाळ रिलीफ फंड त्यांच्याकडून दोन लाख रुपये व दत्तात्रय भरणे यांच्या फंडातून पाच लाख रुपये या रकमेतून ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम चालू करण्यात आले होते सदरचे काम अवघ्या दोन ते अडीच लाख रुपयात करण्यात आले आहे तसेच काम सदोष अनियमित करण्यात आले आहे. असे मत प्रहार संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणतात की सदर ओड्याची खोली व रुंदी बाबत कृषी विभागाकडून मोजमाप घेण्यात आले आहे प्रत्यक्षात वाड्याची खोली व रुंदी याचा विचार न करता मोजमाप करून खोली व रुंदी जास्त दाखवण्याचा उद्योग कृषी विभाग यांच्याकडून करण्यात आलेला आहे. यावरून प्रशासनाकडून ठेकेदाराची अर्थपूर्ण संबंध ठेवले असावेत असे दिसते म्हणून मौजे निमगाव केतकी येथील ओढा खोलीकरण व रुंदीकरण कामाची चौकशी सक्षम पथकाद्वारे करून सदर ठिकाणी करण्यात आलेला भ्रष्टाचार कारभाराची तपासणी करून उचित कारवाई करावी असे तक्रार पत्रात संजय राऊत यांनी म्हणले आहे.
शेवटी संजय राऊत म्हणाले की सदरचा ओढा खोलीकरण व रुंदीकरण अनियमतेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष संजय शिवाजी राऊत 24 /5 /20२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव केतकी समोर अमरण उपोषणाला बसलो होतो , 26 मे रोजी विद्यमान सरपंच निमगाव केतकी व गटविकास अधिकारी इंदापूर यांनी उचित कारवाई करण्याचे पत्र दिले होते परंतु अद्याप संबंधित ओढयाची शासकीय मोजणी करण्यात आलेली नाही ही बाब गंभीर व दिशाभूल करणारे असून संबंधित सरपंच व गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी चौकशी न झाल्यास व कारवाई न झाल्यास आम्हाला प्रहार स्टाईलने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असे तक्रार पत्र प्रहार संघटनेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष यांनी म्हटले आहे.
एकंदरीतच येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे याबाबत कोणती कारवाई करतील की या विषयांमध्ये काही राजकीय हालचाली होतील याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.