
निमगाव केतकी प्रकरणातील ‘त्या’ व्यक्तीचा खूनच !
पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे व्याहाळी रस्त्यावर महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाच्या पायरी जवळ (दि.२९) रोजी धोंडिबा नामदेव रुपनवर ( वय ६० ) रा.दगडवाडी हे मृत्यअवस्थेत आढळून आले.यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी एका इसमास अटक केली आहे.
याबाबत पोपट धोंडीराम रूपनवर ( वय ३४ ) रा.दगडवाडी ता.इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडील धोंडीराम नामदेव रुपनवर यांना दारूचे नशेत त्यांचेशी वादविवाद करून आरोपीने डोक्यात दगड घालून अथवा दगडावर आपटून गंभीर जखमी करून खून केला आहे.दरम्यान इंदापूर पोलिसांनी याप्रकरणी भा.द.वि. कलम ३०२, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून धनाजी विठ्ठल करे ( वय ३८ ) नामे व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.व पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.धोत्रे हे करीत आहेत.