इंदापूर
निमगाव केतकी येथील कान्होबा मळा येथे लागलेली भीषण आग
आगीची माहिती कळताच अग्निशमन घटनास्थळी दाखल

निमगाव केतकी येथील कान्होबा मळा येथे लागली भीषण आग
आगीची माहिती कळताच अग्निशमन घटनास्थळी दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे निमगाव केतकी येथील कान्होबा मळा ओढ्यात अचानक आग लागली असून सदरील आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ या ठिकाणी आग विझवण्यासाठी दाखल झाली.
या आगीत पंकज प्रकाश महाजन यांच्या शेततळ्यावरील पेपरचे नुकसान झाले आहे.तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या वीज वाहक तारा, पॅनल बॉक्स इत्यादींचे नुकसान झाले आहे.
दरम्यान आग विझविण्यासाठी निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या आपत्ती व्यवस्थापन ला माहिती कळताच घटनास्थळी शेकडो तरुण वर्ग मदतीसाठी उपस्थित राहिला त्यामुळे निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे यांनी आभार मानले.