निराधारांच्या योजनांचे पैसे न मिळाल्याने इंदापूरात आंदोलन
संबंधित लाभार्थ्यांची आर्थिक हेळसांड सुरू..

निराधारांच्या योजनांचे पैसे न मिळाल्याने इंदापूरात आंदोलन
संबंधित लाभार्थ्यांची आर्थिक हेळसांड सुरू..
इंदापूर; प्रतिनिधी
गेली दोन महिने संजय गांधी निराधार योजनांचे पैसे जमा न झाल्याने इंदापूरातील तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाच्या वतीने सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
देण्यात आलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र व केंद्र शासनाच्याअंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजनांचे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अनुदानजमा झाले नाही. यामुळे संबंधित लाभार्थ्यांची आर्थिक हेळसांड सुरू आहे. यामुळे या लाभार्थ्यांच्या अनुदान लवकरात लवकर जमा करण्याची मागणी केली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली.
यावेळी सागर मिसाळ, विकास खिलारे, संजय शिंदे, अक्षय कोकाटे, श्रीकांत मखरे, तमन्ना शेख, रूपाली रणदिवे, गणेश देवकर, संजय शिंगाडे, विकास चितारे, अजय पारसे, शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते.