निरा नदीचे पाणी ओसरले;नदीकाठच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा
शेतीचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मिटला

निरा नदीचे पाणी ओसरले;नदीकाठच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा
शेतीचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मिटला
इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या पंधरवड्यात वीर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निरेचे पात्र तुडुंब भरून वाहत होते.मात्र वीर धरणातील सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण काही मात्र प्रमाणात कमी झाल्याने नदीचे पाणी ओसरले असून नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून शनिवारी 22301 क्युसेकने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता परंतु वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील सराटी येथील नीरा नदीचे पाणी ओसरले असल्याचे चित्र सध्या आहे.
दरम्यान निरेच्या लगत लागून असलेल्या गावातील विहिरींचे पाणी बऱ्या प्रमाणात वाढलेले आहे.शेतीचा पाणी प्रश्न सध्यातरी मिटलेला दिसून येत आहे.