स्थानिक

बारामतीच्या फैझल सय्यद यांची भूमिका असलेली “नेताजी” या लघुपटाची राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत निवड.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रशांत पांडेकर याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

बारामतीच्या फैझल सय्यद यांची भूमिका असलेली “नेताजी” या लघुपटाची राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत निवड.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रशांत पांडेकर याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती:पराक्रम दिवसाचे (२३ जानेवारी) औचित्य साधून, ” मिनिस्ट्री ऑफ इन्फॉरमेशन ऍण्ड ब्रॉडकास्टींग, भारत सरकार” आणि ” नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” (NFDC) यांनी राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आयोजित केली होती. नॉन प्रोफेशनल आणि प्रोफेशनल अश्या दोन विभागात ही स्पर्धा संपन्न झाली.

त्यामधील प्रोफेशनल विभागात ” पॅसिफिक फिल्म फॅक्टरी” आणि ” रागाज वर्ल्ड” या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ” नेताजी” या लघुपटाची निवड झाली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रशांत पांडेकर याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच लेखन, संवाद आणि पटकथेची जबाबदारी देखील त्याने सांभाळली आहे. या लघुपटासाठी छायाचित्रण अन्सार खान, कार्यकारी निर्माता ऊर्मिलकुमार पंड्या, प्रोडक्शन मॅनेजर अमोल लोणकर, अक्षय रणदिवे, अतुलसाबळे; कॅमेरा सहाय्यक आदित्य कमोदकर, रंगभूषा हर्षद खुळे, केशभूषा वैभव बंड, कला नाहीन बागवान, वेशभूषा पूजा जाधवराव, ध्वनी संयोजन अनुप कुलकर्णी, व्हीएफएक्स कॉ-ऑर्डिनेटर प्रशिक लोखंडे, उपशीर्षक गणेश खुडे यांनी काम पाहील आहे. आशय देशपांडे याने संकलन तर नितीन-प्रसाद, शुभम कोळेकर यांनी पार्श्वसंगीत केल आहे. लघुपटामध्ये फैजल सय्यद, माधुरी शिंदे, सचिन बांगर, रेवण जवळे, प्रशांत बोगम, मनन पंड्या, श्रीकांत निंबाळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या स्पर्धेमध्ये देशभरातून हजारो लघुपट सहभागी झाले होते. एक लाख रुपये, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध मान्यवरांकडून या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!