निरा भिमा कारखान्याचे सन 2020-21 साठी ऊस लागवड धोरण जाहीर
कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी केले जाहिर..
निरा भिमा कारखान्याचे सन 2020-21 साठी ऊस लागवड धोरण जाहीर.
कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी केले जाहिर..
इंदापूर: सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
शहाजीनगर ता.इंदापूर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड हंगाम सन 2020-21 करीताचे ऊस लागवडीचे धोरण राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.या धोरणानुसार ऊस उत्पादन तंञाचा अवलंब करून शेतक-यांनी जास्तीत जास्त क्षेञावरती लागवड करून ऊसाचे प्रति एकरी सुमारे 100 टनाहून अधिकचे ऊस उत्पादन घ्यावे,असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
नीरा भीमा कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण पुढील प्रमाणे आहे.
1) आडसाली- लागवड कालावधी – 15 जुलै ते 31 ऑगस्ट, दिवस 48, (लागवड क्षेत्र 15 टक्के)- को.86032, व्ही.एस.आय.8005, फुले 0265
2) पूर्व हंगाम – (लागवड कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर, दिवस 91(लागवड क्षेत्र 30 टक्के)- कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, फुले 0265, एम.एस.10001,
3) सुरू= (लागवड कालावधी -1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी,दिवस 90 )(लागवड क्षेत्र 15 टक्के)-कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001 तसेच लागवड कालावधी -1 डिसेंबर ते 31 जानेवारी,दिवस 62 (लागवड क्षेत्र 15 टक्के) – फुले 0265
4) खोडवा- (लागवड- कारखाना सुरू झालेपासून ते बंद होईपर्यंत (लागवड क्षेत्र 40 टक्के)- वरील सर्व जाती.
ते पुढे म्हणाले, ऊसाची लागण पूर्ण होताच शेतकऱ्यांनी त्या क्षेत्राची नोंद त्याच दिवशी शेतकी विभागाकडे देणे बंधनकारक आहे.तसेच जेवढ्या क्षेत्राची लागण पुर्ण झाली आहे, तेवढ्यात क्षेत्राची लागण तारीख ग्राह्य धरली जाईल.
ऊस उत्पादक शेतक-यांनी योग्य बेणे निवड, बेणे प्रक्रिया, लागवड पध्दती,रोप लागण पध्दत, रासायनिक खतांच्या माञा, ठिबक मधून द्यायवयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण या प्रमाणे ऊस उत्पादनाचे तंञ वापरल्यास प्रति एकरी 100 टन किंवा अधिकचे ऊसाचे उत्पादन घेता येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ऊस तोडणीचा कार्यक्रमात ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी 671, व्ही.एस.आय.8005 व व्ही.एस.आय.10001 या लवकर पक्व होणा-या व जादा साखर उतारा असणा-या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर को.86032 या ऊस जातीची तोडणी करण्यात येईल व त्यानंतर फुले 265 या ऊस जातीची तोडणी ही लागण तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार केली जाईल ,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
निरा भिमा कारखाना ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवित आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन योजना, बेणे पुरवठा, माती परीक्षण यांचा ऊस उत्पादक शेतक-यांनी लाभ घ्यावा.तसेच कारखान्याकडील उत्पादित सेंद्रिय खतांचा वापर हा ऊस उत्पादक शेतक-यांनी करावा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्रभारी कार्यकारी संचालक एस.जी.गेंगे-पाटील उपस्थित होते.