“निरोगी बालपण” उपक्रमाचा इंदापूरमध्ये शुभारंभ…
गोरे हॉस्पिटल व रोटरी क्लब इंदापूरचा अभिनव उपक्रम.
“निरोगी बालपण” उपक्रमाचा इंदापूरमध्ये शुभारंभ…
गोरे हॉस्पिटल व रोटरी क्लब इंदापूरचा अभिनव उपक्रम.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे (तालुका प्रतिनिधी)
कोरोना वैश्विक महामारिने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे.या संकटाचा फटका आपल्या देशाला राज्याला तसेच इंदापुर तालुक्याला ही बसलेला आहे. अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होऊन बसली आहे.
त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोना परिस्थिती मध्ये गोरे हॉस्पिटल व रोटरी क्लब इंदापुर यांचा संयुक्त विद्यमाने एक समाजउपयोगी अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.त्या नुसार “निरोगी बालपण”या उपक्रमाअंतर्गत जन्मलेल्या बाळापासून ते १८ वर्षा खालील सर्व रुग्णांची दररोज पुढील एक महिन्यापर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत मोफत तपासणी केली जाणार आहे.
आज डॉक्टर्स डे चे औचित्य साधून या उपक्रमाचे उदघाटन रोटरी क्लब इंदापूरचे अध्यक्ष अजिंक्य इजगुडे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा होते. यावेळी प्रदीप गारटकर यांनी डॉक्टर गोरे व रोटरी क्लब यांच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करून अडचणीत असलेल्या गोरगरीब जनतेला या उपक्रमाचा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली.
या वेळी रोटरी क्लब तर्फे डॉ पंकज गोरे व त्यांचे वडील प्रा.पांडुरंग गोरे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला वसंतराव माळूजकर, ज्ञानदेव डोंबाळे, राकेश गानबोटे, शशिकांत शेंडे,उदय शहा,नगरसेवक अनिकेत वाघ,सुनील मोहिते,प्रशांत भिसे, आसिफ बागवान,दशरथ भोंग,प्रशांत शेटे, भीमाशंकर जाधव,शंकर करे इत्यादी उपस्थित होते.