राजकीय

निवडणूक निकालानंतर राज्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार का!;शरद पवार-अजित पवार पुन्‍हा एकत्र येतील? सुप्रिया सुळे म्‍हणतात..

राज्‍यातील मतदारांच्‍या मनात स्‍पष्‍टता आहे.

निवडणूक निकालानंतर राज्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार का!;शरद पवार-अजित पवार पुन्‍हा एकत्र येतील? सुप्रिया सुळे म्‍हणतात

राज्‍यातील मतदारांच्‍या मनात स्‍पष्‍टता आहे. त्‍

बारामती वार्तापत्र

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्‍यांमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झडत आहेत. निवडणूक निकालानंतर राज्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याच्‍यावरही चर्चा रंगत आहेत.

शरद पवारांपासून फारकत घेत महायुतीत सहभागी झालेल्‍या अजित पवार निवडणुकीनंतर पुन्‍हा स्‍वगृही येतील का, या प्रश्‍नाचे उत्तर राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्‍या नेत्‍या सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

राज्‍यातील मतदारांच्‍या मनात स्‍पष्‍टता

‘पीटीआय’ला दिलेल्‍या विशेष मुलाखतीमध्‍ये सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या की, “लोकसभा निवडणुकीत राज्‍यातील जनतेने ठामपणे मतदान केले. लोकसभेच्‍या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्‍या. विरोधी आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्ष उमेदवाराचाही विजय झाला. आताही राज्‍यातील मतदारांच्‍या मनात स्‍पष्‍टता आहे. त्‍यामुळे लोकसभा निवडणुकीसारखीच कामगिरी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीही करेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राजकीयदृष्ट्या आमच्या विचारधारा वेगळ्‍या

२०२३ मध्‍ये अजित पवारांनी राष्‍ट्रवादीला खिंडार पाडत आपली वेगळी चूल मांडली. ते भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्‍या महायुती सरकारमध्‍ये सहभागी झाले. आता विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का, यावर बोलताना सुळे म्‍हणाल्‍या की, शरद पवार आणि अजित पवार हे राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येतील की नाही हे सांगणे कठीण आहे. अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहेत तोपर्यंत अशा प्रकारचे मनोमिलन सोपे होणार नाही. कारण राजकीयदृष्ट्या आमच्या विचारधारा वेगळ्‍या आहेत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आम्‍ही मुख्‍यख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही

मी विधानसभा निवडणूक लढवत नाही. तसेच राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्‍ये नसल्‍याचे यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे. आमच्याकडे स्पष्टता आहे. आम्‍ही महाविकास आघाडी म्‍हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमचा पक्ष राजकीय रणनीतीसाठी नसून सेवेसाठी आहे. आम्‍ही २८८ पैकी ८६ मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. आपण मित्रपक्षांबद्दल आदर बाळगला पाहिजे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

बारामतीमधील निवडणूक ही वैचारिक लढाई

पवार घराण्याचा बालेकिल्ला मानल्‍या जाणार्‍या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ही लढत वैचारिक लढ्यापेक्षा जास्त काही नाही, असेही या वेळी सुप्रिया सुळेंनी स्‍पष्‍ट केले. आमचा पक्ष काँग्रेससोबत आहे आणि ते (अजित पवार) भाजपसोबत आहेत. ही एक वैचारिक लढाई आहे, असेही सुप्रिया सुळेंनी स्‍पष्‍ट केले. नेत्यांना जनतेत आपल्‍या भावना दर्शवण्‍याची परवानगी नाही. जर नेता तुटला तर घरातील लोक कसे जगतील. नेता होणे हे एकटेपणाचे काम आहे. आपण आपल्या वागण्यात सहानुभूतीशील आणि दयाळू असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर अन्‍याय झाला

अजित पवार निर्णयप्रक्रियेतील प्रभावशाली पदावर आहेत. आम्ही राष्ट्रीय पक्ष होतो, आमचा दर्जा कमी करण्यात आला. आमचा पक्षच बेकायदेशीरपणे मोडला गेला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढा सुरूच आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्‍यासोबत जे केले झाले ते पूर्णपणे अन्यायकारक आहे,” असेही त्‍यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!