‘निसर्ग पर्यटन तसेच वनपर्यटन स्थळांचा विकास’ अंतर्गत राज्यात ३९ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता
इंदापूर येथील चिंकारा संरक्षण व जैव विविधता वनउद्यानासाठी 3 कोटी 43 लाख 5 हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली
‘निसर्ग पर्यटन तसेच वनपर्यटन स्थळांचा विकास’ अंतर्गत राज्यात ३९ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता
इंदापूर येथील चिंकारा संरक्षण व जैव विविधता वनउद्यानासाठी 3 कोटी 43 लाख 5 हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली
मुंबई,बारामती वार्तापत्र रिपोर्ट
निसर्ग पर्यटन तसेच वनपर्यटन स्थळांचा विकास अंतर्गत राज्यात 39 कोटी 22 लाख रुपये खर्चाच्या नवीन तसेच चालू बाब प्रस्तावांना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील चार प्रस्ताव निसर्ग पर्यटन तसेच वनपर्यटन स्थळ विकास अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आले असून त्यामध्ये मौजे कन्हेरी येथे वनपर्यटन विषयक माहिती उद्यान तथा वन्यप्राणी अधिवास विकास परिसर यासाठी 6 कोटी 48 लाख रुपये, मौजे कडबनवाडी, गट नं. 36, ता. इंदापूर येथील चिंकारा संरक्षण व जैव विविधता वनउद्यानासाठी 3 कोटी 43 लाख 5 हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून मौ. पाचगाव पर्वती फॉरेस्ट, सं.नं. 1 येथील तुळजाई वनउद्यानाच्या अनुक्रमे 3 कोटी 60 लाख 2 हजार रुपये आणि 1 कोटी 40 लाख 35 हजार रुपयांच्या दोन प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली आहे.
नवीन प्रस्तावाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभाग पांढरकवडा (टिपेश्वर) साठी 11 कोटी 38 लाख रुपये, मौजे पोहरादेवी बायोलॉजिकल पार्कसाठी 11 कोटी 1 लाख रुपये इतक्या रकमेचे नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर श्री महालक्ष्मी संस्थान देऊळगाव (वडसा) साठी 34 लाख 66 हजार रुपये, श्री संत मुंगसाजी महाराज समाधीस्थळ, धामणगाव देव- 26 लाख 6 हजार रुपये, नेर वनउद्यान (अरोमा पार्क)- 68 लाख 86 हजार रुपये, जैवविविधता वन उद्यान, वडगाव (जांब) साठीच्या 61 लाख 46 हजार रुपयांच्या चालू बाब प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली आहे.