
नीरा नदीतून आज २३ हजार १८५ क्युसेक्स विसर्ग
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
बारामती वार्तापत्र
इंदापूर बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी नीरा खोऱ्यातील चारही धरणे पूर्ण पणे भरली आहेत. त्यामुळे वीर धरणातून २३ हजार १८५ क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देखील जलसंपदा विभागाने दिला आहे.
आज एका दिवसात वीर धरणाच्या सांडव्यातून तब्बल अठरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढला. दरम्यान भाटघर धरण, नीरा देवघर धरण, गुंजवणी आणि वीर ही चारही धरणे पूर्ण भरलेली असल्यामुळे निरा डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून ५९९ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.