बारामती सहकारी बॅंकेच्या चेअरमन सचिन सदाशिव सातव तर उपाध्यक्षपदी रोहित वसंतराव घनवट यांची बिनविरोध निवड
दोन अर्ज दाखल होत निवडणूक बिनविरोध पार पडली.

बारामती सहकारी बॅंकेच्या चेअरमन सचिन सदाशिव सातव तर उपाध्यक्षपदी रोहित वसंतराव घनवट यांची बिनविरोध निवड
दोन अर्ज दाखल होत निवडणूक बिनविरोध पार पडली.
बारामती वार्तापत्र
बारामती: नुकतीच बारामती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये चेअरमन पदासाठी इच्छुकांनी मागणी केली होती. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी चेअरमनपदी सचिन सदाशिव सातव तर व्हा.चेअरमनपदी रोहित वसंतराव घनवट यांना संधी दिली.
बॅंकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन भिगवण रस्त्यावरील बॅंकेच्या मुख्य शाखेत करण्यात आले होते. रविवारी (दि. २६) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालकांची एक बैठक घेवून मते जाणून घेतली होती.
अखेर अध्यक्षपदी सचिन सदाशिव सातव यांची तर उपाध्यक्षपदी रोहित वसंतराव घनवट यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे त्यांनी ही दोन नावे दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार दोन अर्ज दाखल होत निवडणूक बिनविरोध पार पडली.