नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली; इंदापूर माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस.
नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली; इंदापूर माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस.
इंदापूर:-प्रतिनिधी
नीरा नदीवरील वीर, भाटघर, गुंजवणी,नीरा देवधर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात
दमदार पाऊस सुरू असल्याने पुणे, सातारा, सोलापुर जिल्हाला वरदाण ठरलेले वीर धरण ओव्हरफ्लो च्या मार्गावर आहे.
तसेच गुरूवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसाचे पाणी वीर धरणात येत असल्यामुळे पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे गुरूवारी (दि.१३) रात्री साडेसात वाजता वीर धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उचलून ३२ हजार ३६८ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला असून वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सराटी (ता.इंदापूर) येथील जुन्या बंधाऱ्याला पाणी टेकले असून नदी दुथडी भरून वाहत आहे.
नीरा नदीत पाणी आल्यावर नदी काठच्या अनेक गावांतील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी सुधारते. त्यामुळे निरेच्या प्रवाहाप्रती सर्वच स्तरातून कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. नीरा नदी पुढे जाऊन संगम (ता.माळशिरस) येथे भिमेला जाऊन मिळत असल्यामुळे या पाण्याने संगमपासून पुढे भिमेचा प्रवाह सुरू झाला आहे.