शृंगार साहित्य खरेदीसाठी महिलांनी केली गर्दी
मुख्य बाजारपेठेत महिलांची गर्दी पहावयास मिळाली

शृंगार साहित्य खरेदीसाठी महिलांनी केली गर्दी
मुख्य बाजारपेठेत महिलांची गर्दी पहावयास मिळाली
इंदापूर प्रतिनिधी –
मकर संक्रांती महिलांचा महत्त्वाचा सण मानला जातो. त्यानिमित्ताने महिला सजावटीच्या वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना पहावयास मिळत आहेत. बांगडी,चुडे, पाटल्या,मेहंदी, टिकली, नेलपॉलिश, बिंदी,लिपिस्टिक, साज शृंगारचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे.
तिळगुळ,हळदी, कुंकू,रेवडी, चिक्की विक्रीच्या दुकानात प्रचंड गर्दी झाली आहे. इंदापुरातील मुख्य बाजारपेठेत महिलांची गर्दी पहावयास मिळाली आहे.