नूतन विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष आटोळे तर व्हा चेअरमन पदी सोनिया टमके यांची बिनविरोध निवड
संस्थेचे आधारस्तंभ प्रभाकर चिंचवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ संचालकांची बिनविरोध निवड
नूतन विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष आटोळे तर व्हा चेअरमन पदी सोनिया टमके यांची बिनविरोध निवड
संस्थेचे आधारस्तंभ प्रभाकर चिंचवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ संचालकांची बिनविरोध निवड
इंदापूर : प्रतिनिधी
कुर्डूवाडी येथील नूतन विद्यालय प्रशाला सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थेचे आधारस्तंभ प्रभाकर चिंचवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या संचालकांच्या विशेष बैठकीमध्ये चेअरमन पदासाठी संतोष आटोळे यांचा व व्हाईस चेअरमन पदासाठी सोनिया टमके यांचेच अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस. कोळी यांनी जाहीर केले.
याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक श्रीराम चंदुलाल म्हमाणे,पांडुरंग दशरथ कुबेर, अनिल भागवत कांबळे, ललिता अरुण यमगर, सचिन मधुकर भोंग,नागनाथ माणिक कांबळे, श्याम मारुती ठाकर, प्रशांत वसंतराव डोळे हे उपस्थित होते.दरम्यान नूतन विद्यालयाचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके, उपमुख्याध्यापिका अनिता मस्के,परिवेक्षक संजय यादव, शिक्षक प्रतिनिधी आरती कराडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुहास शिंगाडे व संस्थेचे सचिव बाळासाहेब पोटे यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन संतोष आटोळे यांनी सर्व संचालक व सभासद हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले.तसेच चेअरमन पदाच्या मिळालेल्या संधीच्या माध्यमातून कर्जदार, ठेवीदार, व सभासद यांचा समन्वयातून पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ कांबळे यांनी तर आभार ज्येष्ठ संचालक पांडुरंग कुबेर यांनी मानले.