स्थानिक

न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 26 जणांची  निर्दोष मुक्तता

2012 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता.

न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 26 जणांची  निर्दोष मुक्तता

2012 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता.

बारामती वार्तापत्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची ऊसदर आंदोलनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहेत. बारामती सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. या दोघांसह 26 जणांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे कारण देत निर्दोष मुक्त केलं आहे. (Sadabhau Khot Raju Shetti Innocent acquitted sugarcane price movement)

नेमकं प्रकरणं काय? 

बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या परिसरात 2012 मध्ये ऊसदर वाढीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी कारखान्यावर गाड्यांचे टायर फोडणे, ट्रॅक्टरचे टायर फोडणे, वाहतुकदारांचे नुकसान करणे इत्यादी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत एकूण 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज बारामतीतील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. गिऱ्हे यांनी याबाबत सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान 26 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यातील एक आरोपीचा मृत्यू झाला आहे.

2012 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात २०१४ मध्ये हा खटला सुरु झाला. आज तब्बल नऊ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. या निकालानंतर माजी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

YouTube player

दाखल झालेले गुन्हे सरकारला सिद्ध करता आले नाहीत : राजू शेट्टी 

आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी हे आंदोलन केलं. ते दडपण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. मात्र न्यायालयात गेल्यानंतर सर्वानाच सत्य बोलावं लागतं. त्यानुसार आमच्यावर दाखल गुन्हे सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

जनतेचा आवाज दाबता येत नाही : सदाभाऊ खोत 

तर तत्कालीन आघाडी सरकारने ताकदीच्या बळावर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्रात आमच्यावर दोनशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. ताकदीच्या बळावर राज्य करता येतं. पण जनतेचा आवाज दाबता येत नाही हे आज सिद्ध झाल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!