पंतप्रधान च्या वाढदिवसानिमित्त वैदकीय साहित्य वाटप
कारभारी अण्णा चॅरिटेबल फौंडेशन चा सामाजिक उपक्रम
पंतप्रधान च्या वाढदिवसानिमित्त वैदकीय साहित्य वाटप
कारभारी अण्णा चॅरिटेबल फौंडेशन चा सामाजिक उपक्रम
बारामती:वार्तापत्र
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन बारामती व बीकेटी टायर्स द्वारा कामठे ऑटोमोटीव्ह कात्रज पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना (कोविड-१९) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जपत कोरोना महामारीमध्ये नागरीकांकरीता अहोरात्र प्रयत्न करणारे कोरोना सेवक हे कोविड रूग्ण यांना अॅडमीट करून त्यांचेवर मोफत उपचार करतात तसेच बारामती तालुक्यातील व जवळच्या अनेक तालुक्यातील संशयीत रुग्णांची स्वब तपासणी मोफत केली जाते, तसेच बारामती येथील मुस्लिम समाजातील तरूण हे कोरोना संसर्गामुळे मयत झालेल्या व्यक्तींचे दहन व दफन चे कार्य करीत असतात तसेच बारामती मधील विविध कोविड सेंटर मधील वैद्यकीय राम अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सिस्टर, वॉर्डबॉय व सफाई कर्मचारी असे बारामती नगर परिषद मधील आरोग्य तसेच अन्य विभागातील सर्व कोरोना योद्धा आहोरात्र शहरातील कोरोना यंत्रणा आपल्या जिवाची बाजी लावून योग्य पद्धतीने हाताळत असून त्यांच्यासाठी सुद्धा – १८०, सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल ५० + १० ऑक्सीमिटर, रूई ग्रामीण रूग्णालय कोविड सेंटर – १०, मुस्लिम समाज कब्रस्तान – ५०, डॉ. श्री. शशांक झळक १०, डॉ. श्री. सुनिल पवार – १०, डॉ. श्री. राहुल जाधव (आरोग्य हॉस्पिटल) – ५० या प्रमाणे ४०० पी.पी.ई. किट वाटप करण्यात आले.तसेच रूई ग्रामीण रुग्णालय (कोविड सेंटर) येथे २५० डिस्पॉसिबल बेडशीट व सिल्व्हर ज्युबिली रूग्णालय बारामती येथे २५० असे एकुण ५०० डिस्पॉसिबल बेडशीट कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन व बीकेटी टायर्स द्वारा कामठे ऑटोमोटीव्ह कात्रज पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने वाटप करण्यात आले. सदर पी.पी.ई. किट, डिस्पॉसिबल बेडशीट व ऑक्सीमिटर चे वाटप करतेवेळी कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव तथा पुणे जिल्हा उपाध्यक्ष भा.ज. पा.- मा.श्री.प्रशांत (नाना) सातव, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री. किरणराज यादव, डॉ. श्री. शशांक झळक, डॉ. श्री. राहुल जाधव, डॉ. श्री. सुनिल पवार,डॉ. श्री. सदानंन काळे सि.ज्यु.हॉस्पिटल, डॉ. श्री. सुनिल दराडे रूई ग्रामीण रुग्णालय, आरोग्य कर्मचारी – श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. विजय शितोळे, श्री. उत्तम धोत्रे, बारामती तालुका अध्यक्ष भा.ज.पा. मा. श्री. पांडुरंग कचरे, बारामती शहर अध्यक्ष भा.ज.पा. -मा. श्री. सतिश फाळके, बारामती तालुका अध्यक्ष युवा मोर्चा भा.ज.पा. अॅड. श्री.ज्ञानेश्वर (माऊली) माने, ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री. अजित (बापू) साळुके, अॅड. श्री.
सुहास क्षीरसागर, श्री. दशरथ जाधव, श्री. सागर जाधव, श्री. संदिप मोहिते, श्री. झहीर पठाण, श्री. हेमंत नवसारे, श्री. मुनीर तांबोळी, श्री. विजय देवकाते – पाटील इतर सर्वजण उपस्थित होते.