पक्की वाहन अनुज्ञप्ती चाचणीसाठीच्या वेळेत बदल
संबंधित उमेदवारांना सारथी प्रणालीव्दारे एस.एम.एस पाठविण्यात आले आहेत.
पक्की वाहन अनुज्ञप्ती चाचणीसाठीच्या वेळेत बदल
संबंधित उमेदवारांना सारथी प्रणालीव्दारे एस.एम.एस पाठविण्यात आले आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती शहर व ग्रामीण भागामध्ये दिनांक 07 ते 20 सप्टेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीमध्ये जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता. या कारणास्तव जे उमेदवार पक्की अनुज्ञप्ती चाचणी साठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे वाहन चाचणीचे कामकाज होऊ शकले नाही.
संबंधित उमेदवारांना सारथी प्रणालीव्दारे एस.एम.एस पाठविण्यात आले आहेत.
ज्या उमेदवारांना एस.एम.एस व्दारे सूचना प्राप्त झाली नाही . अशा उमेदवारांकरीता वाहन चाचणीच्या अपॉईमेंट राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने पुढीलप्रमाणे बदलण्यात आल्या आहेत.
7 व 8 सप्टेंबर 2020 रोजीची होणारी चाचणी शनिवार,26 सप्टेंबर 2020 रोजी हाईल.
9 व 10 सप्टेंबर 2020 रोजी होणारी चाचणी रविवार , 27 सप्टेंबर 2020 रोजी होईल. 11 ते 14 सप्टेंबर 2020 रोजी होणारी चाचणी 02 ऑक्टोबर 2020 रोजी होईल.
15 व 16 सप्टेंबर 2020 रोजीची होणारी चाचणी शनिवार , 03 ऑक्टोबर 2020 रोजी होईल.
17 व 18 सप्टेंबर 2020 रोजी होणारी चाचणी रविवार, 04 ऑक्टोबर 2020 रोजी होईल.
तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती साठी दैनंदिन कोट्यामध्ये वाढ करण्यात आली असून वरील कालावधीमध्ये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अपॉईमेंट घेतलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अपॉईमेंट रिशेड्युल करून घ्यावी असे, आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.