स्थानिक

पन्नास हजार रुपयांच्या वयक्तीक जातमुचलक्यावर नगरसेवक बबलू देशमुख यांच्यासह पाच जणांना जामीन

अकरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मिळाला जामीन

पन्नास हजार रुपयांच्या वयक्तीक जातमुचलक्यावर नगरसेवक बबलू देशमुख यांच्यासह पाच जणांना जामीन

अकरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मिळाला जामीन

बारामती वार्तापत्र
बारामतीच्या बहुचर्चित असलेल्या व्यवसायिक प्रीतम शहा लेंगरेकर यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संशयित पाच आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. एस टी भालेराव यांच्यासमोर सुनावणीत आरोपींना जामीन मिळाला.
बारामती चे प्रसिद्ध व्यवसायिक प्रीतम शहा यांची आत्महत्या ही खाजगी सावकारी तून झाले असल्याचे व मानसिक छळातून झाली असल्याचे त्यांच्या मुलानी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यामुळे बारामती नगरपालिकेचे नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे यांच्यासह नऊआरोपींवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून हे प्रकरण संपूर्ण जिल्हाभर चर्चेत होते आरोपींना जामीन मिळण्यास अडचण येत होती मात्र आजच्या सुनावणीत पाच संशयित आरोपींना पन्नास हजार रुपयांच्या बॉन्डवर जामीन मिळाला आहे. नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख माजी सभापती संजय काटे सनी आवळे विकास धनके प्रवीण गालिंदे या पाच जणांना जामीन मिळाला आहे.

व्यापार्‍यांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम

अवैध सावकारी च्या बारामतीतील प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याने शहरांमध्ये बाजारपेठेत तणाव निर्माण झाला आहे अनेक छोटे-मोठे व्यापारी एकमेकांकडून व्यवसायासाठी हात उसने पैशांची उलढाल करत असतात मात्र या अवैध सावकारी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून व्यापार पेठेत तणाव निर्माण झाला आहे. सदरच्या गुन्हयामुळे बाजारपेठेत एकमेकांविरोधात देणे असलेल्या हात उसने पैशावरही काही व्यापारी काणकुण करत आहेत अनेकदा तर एखाद्याला दिलेले छोट्या स्वरूपातील रक्कमही परत कशी मागायची यामुळे पैसे परत देऊ नको अशी विनवणी करत असल्याची परिसरात चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!