
पलंगे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम
गरजूंना केले पाचशे ब्लँकेटचे वाटप
बारामती वार्तापत्र
स्वर्गीय विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठान व पलंगे पेट्रोलियम यांच्या वतीने दरवर्षी गरजू लोकांसाठी वेगवेगळे मदतीचे उपक्रम राबवले जातात .यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे वंचित गरीब लोक उघड्यावर असतात त्यांना मायेची उब म्हणून थंडीत संरक्षण करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तुळजापूर ,गाणगापूर, अक्कलकोट ,पंढरपूर येथील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन या मदतीचे वाटप करण्यात आले .पलंगे कुटुंबियांनी कोरोणा महामारी च्या काळात लॉक डाऊन मध्ये सामान्य माणसाला धान्याचे किट वाटप केले होते. बारामती शहरातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी गणेश पलंगे,निलेश ( भाऊ ) पलंगे, शैलेश पलंगे, जितेश पलंगे ,उमेश पलंगे, संजय किर्वे आदींनी पुढाकार घेतला.