पवारांच्या गोविंद बागेसमोर धनगर समाजाचे आंदोलन
उद्या अजितदादांच्या बंगल्यासमोर ढोल वाजविणार.
बारामती वार्तापत्र
धनगर समाजाचा अनुसूचीत जमाती मध्ये समावेश करावा यासाठी धनगर समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल बजाव आंदोलनाची मोहिम सुरू केली आहे, आज ज्येष्ठ नेेते शरद पवार यांच्या गोविंदबागेतील निवासस्थानासमोर धनगर आंदोलकांनी ढोल वाजवून आरक्षणाची मागणी केली.
गोविंदबागेसमोरही आंदोलकांनी ढोल वाजवत आरक्षणाची मागणी केली. पांडूरंग कचरे यांनी धनगर समाजास आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू असा इशारा दिला. दरम्यान उद्या आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर ढोल वाजविणार आहेत.