पंढरपूर

पवार कुटुंबामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तीन पराभव झाल्यानंतर आता एकत्रीकरणाची “आशा”; कारण त्यातून साधायची आहे सत्तेच्या वळचणीची दिशा!!

एक पवार जिंकले, तरी दुसरे पवार हरले

पवार कुटुंबामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तीन पराभव झाल्यानंतर आता एकत्रीकरणाची “आशा”; कारण त्यातून साधायची आहे सत्तेच्या वळचणीची दिशा!!

एक पवार जिंकले, तरी दुसरे पवार हरले

बारामती वार्तापत्र

पवार कुटुंबामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तीन पराभव झाल्यानंतर आता एकत्रीकरणाची “आशा” बळावू लागली आहे. या सगळ्यातून केवळ सत्तेच्या वळचणीची दिशा साधायची आहे, हेच सत्य यातून उघड्यावर आले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पवार घराण्यातल्या दोन व्यक्तींना पराभवाचे चटके बसले. बारामतीतून जरी एक पवार जिंकले, तरी दुसरे पवार हरले. त्यातून पवार कुटुंबातला वाद जास्तीत जास्त गहिरा होत गेला. आता निवडणुका संपल्या त्यामुळे पवार कुटुंबातला एक घटक सत्तेच्या वळचळीपासून दूर झाला.

तो सत्तेच्या वळचणीला आणला जावा यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असून त्यातलाच एक भाग म्हणून पवार कुटुंबातले वाद मिटावेत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी आज पंढरपूर मध्ये विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्याला साकडे घातले. झाले गेले ते विसरून जाऊन सगळ्या पवार कुटुंबाने एक व्हावे, अशी अपेक्षा आशाताईंनी व्यक्त केली.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांचा निसटता विजय झाला, पण खऱ्या अर्थाने त्यांना तिथे दणकाच बसला. त्यातून सावध होत रोहित पवारांच्या आई सुनंदाताई पवार यांनी देखील पवार कुटुंबाच्या ऐक्याची साद घातली होती.

बारामती मतदारसंघात अजित पवारांचा पराभव व्हावा आणि युगेंद्र पवार यांचा विजय व्हावा यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई या पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत होत्या. त्याबद्दल खुद्द अजितदादांनी देखील आश्चर्य व्यक्त केले होते. आत्तापर्यंत प्रतिभा काकींना मी असे मतदारसंघात फिरताना पाहिले नव्हते, असे उद्गार त्यावेळी अजितदादांनी काढले होते. परंतु प्रतिभाताईंनी प्रचारात भाग घेऊन देखील युगेंद्र पवारांचा विजय होऊ शकला नाही.

सुप्रिया सुळेंनी सांगून देखील युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतलाच नाही??

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पवारांच्या घराण्याने कधी पराभव पाहिले नव्हते. मात्र 2025 सुरू होताना पवारांच्या घराण्यात तीन पराभव पाहावे लागले आहेत. सुरुवातीला पार्थ पवारांचा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आणि त्या पाठोपाठ युगेंद्र पवारांचा बारामती विधानसभा मतदारसंघात पराभव झाला.

पराभवांची ही मालिका थांबवण्यासाठी आणि शरद पवारांचेही कुटुंब पुन्हा सत्तेच्या वळचणीला यावे यासाठी पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी पवारांचे 8 खासदार आणि 10 आमदार आग्रही आहेतच. त्या पाठोपाठ कुटुंबातल्या सुनांनी देखील आग्रह धरल्याचे 2025 च्या सुरुवातीलाच समोर आले आहे. सगळ्या पवार कुटुंबीयांना सत्तेची वळचण खुणावत आहे.

या पार्श्वभूमीवर सगळ्या मराठी माध्यमांनी पवार कुटुंब एक झाले, तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर फार मोठा परिणाम होईल, असे दावे केले आहेत. परंतु, प्रत्यक्षात या समीकरणांचा इतर कुठल्या पक्षांवर दुष्परिणाम होण्यापेक्षा फक्त पवार कुटुंब सत्तेच्या वळचणीला येऊन ठेपेल, यापलीकडे काही घडण्याची शक्यता नाही. कारण कुठल्याही समीकरणांवर परिणाम घडविण्यासारखी आकडेवारी आज पवारांबरोबर शिल्लक उरलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांना पुतण्याच्या पक्षात आपला पक्ष विलीन करणे किंवा काहीतरी “आयडियेची कल्पना” लढवून आपले खासदार आणि आमदार पुतण्याकडे पाठवून देणे आणि आपण “वायले” राहिल्याचे भासवत ठेवणे यापलीकडे दुसरे काही करता येण्याची शक्यता देखील नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!