पाच ऑगस्टपासून सुरू व्यायामशाळा,जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक,मालवाहतुक.
शाळा,कॉलेजे, मेट्रो रेल्वेसेवा, चित्रपटगृहे यावरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे.
पाच ऑगस्टपासून सुरू व्यायामशाळा,जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक,मालवाहतुक.
शाळा,कॉलेजे, मेट्रो रेल्वेसेवा, चित्रपटगृहे यावरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे.
नवी दिल्ली
केंद्र सरकारने बुधवारी देशव्यापी ‘अनलॉक-३’ची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
केली. त्यानुसार, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील योगसंस्था व व्यायामशाळा पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच, आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आणि
मालवाहतुकीवर कोणतेही निबंध नाहीत.
यासाठी आता कोणत्याही प्रकारचे ई-परमीट, पासची गरज लागणार नाही.
सवलती जाहीर करीत असतानाच शाळा,कॉलेजे, मेट्रो रेल्वेसेवा, चित्रपटगृहे
यावरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम
राहणार आहे.
राजकीय व धार्मिक मेळाव्यांवरील निबंध कायम आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा5 करून ‘अनलॉक-३’ची नियमावली जाहीर करीत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
योगसंस्था आणि व्यायामशाळा तब्बल चार महिन्यांनंतर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
येत्या पाच ऑगस्टपासून स्वतंत्र प्रमाणित कामकाज पद्धतीचे (एसओपी)
पालन करून योगसंस्था व व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत.
ही एसओपी आरोग्य मंत्रालय जाहीर करेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश परिस्थिती पाहून ‘कंटेन्मेंट’ झोनबाहेर
काही गोष्टींवर प्रतिबंध लावू शकतात,असे नव्या आदेशात म्हटले आहे. एका
जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात; तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये
जाण्यासाठी कोणताही ‘ई-पास’ काढावा लागणार नाही, असेही केंद्र
सरकारने म्हटले आहे.
हे होणार सुरू
राज्यांशी झालेल्या सल्लामसलतीनंतर योगसंस्था व व्यायामशाळा सुरू
करण्यात येणार आहेत; तसेच रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली आहे.
या आधी ही संचारबंदी रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत लागू होती. आंतरजिल्हा
प्रवासावरील निबंध दूर करण्यात आले आहेत. आता माल वाहतूक व
प्रवाशांना कोणत्याही पास अथवा परवान्याची गरज लागणार नाही, असे
गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
३१ ऑगस्टपर्यंत यावर बंदीच
मेट्रो रेल्वेसेवा, चित्रपटगृहे, तरणतलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृहे, बार,
सभागृहे व तत्सम ठिकाणे, तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा,
करमणूक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समारंभ.