पाच कारखान्यांवर छापे ! अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?
केंद्रीय यंत्रणांची सकाळ पासूनच कारखान्यांवर छापेमारी सुरू

पाच कारखान्यांवर छापे ! अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?
केंद्रीय यंत्रणांची सकाळ पासूनच कारखान्यांवर छापेमारी सुरू
बारामती वार्तापत्र
आयकर विभागानं राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू केली आहे. ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी होत आहे ते सर्वजण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे
जरंडेश्वरवर पुन्हा छापा
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चालवण्यासाठी आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. ईडीनं यापूर्वीचं जरंडेश्वर साखर कारखाना यापूर्वी सील केलेला आहे.
अजित पवार म्हणाले, धाड राजकीय हेतूने असेल तर याचा विचार केला पाहिजे. मी कधीही करचुकवेगिरी केली नाही. नातेवाईक म्हणून जर आमच्या बहिणीच्या घरावर धाड टाकली जात असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा.
सरकार येतात आणि जातात परंतु अशा प्रकारचे राजकारण खालच्या स्तरावर जाऊन केलेले राजकारण असे याच्या आधी कधीही केले गेलेले नाही. राज्यातील राजकारणाची पातळी घसरत चालली आहे.