पाच लाखाच्या बदल्यात 60 लाखाची वसुली , तरीही मागणी सुरूच
मात्र ' सिंघम ' ने केला एक फोन आणि पळताभुई झाली थोडी
पाच लाखाच्या बदल्यात 60 लाखाची वसुली , तरीही मागणी सुरूच
मात्र ‘ सिंघम ‘ ने केला एक फोन आणि पळताभुई झाली थोडी
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस दलाची सूत्रे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वीकारली आणि जिकडे तिकडे अवैध धंदेवाले आणि खाजगी सावकार यांचा झालेला सुळ्सुळाट अचानक गार पडायला लागला. त्यावरही कहर म्हणजे एका खाजगी सावकाराने सामान्य शेतकऱ्याला पाच लाखाच्या बदल्यात 60 लाखाची जमीन खरेदीखताने लिहून घेतलेली परत देण्याची घटना नुकतीच आज बारामती शहरात घडली. ही किमया बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या कर्तव्यदक्ष व सिंघम स्टाईल मूळेच झाल्याची चर्चा बारामती व इंदापूर तालुक्यात सुरू झाली.
याविषयीची हकीकत अशी की इंदापूर तालुक्यातील मौजे तावशी येथील एका सामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतीसाठी गुणवडी ता.बारामतीतील एका खाजगी सावकाराकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते या पाच लाख रुपयां च्या हमीसाठी सावकाराने 60 लाख रुपये किमतीची दोन एकर जमीन खुश खरेदी ने शेतकऱ्याकडून लिहून घेतली आणि पाच लाखाच्या व्याजापोटी त्या शेतकऱ्याने आतापर्यंत 29 लाख रुपये दिले मात्र मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याची सवय ही काही केल्या जात नाही त्यामुळे 29 लाख रुपये आणि दोन एकर जमीन देऊनही अजूनही व्याज पाहिजे म्हणून बऱ्याच दिवसापासून खाजगी सावकारानी सदरच्या शेतकऱ्याकडे तगादा लावला मात्र मागील महिन्यापासून बारामती शहर पोलीस दलाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी अवैध धंदे आणि खाजगी सावकारी चा बिमोड करण्याचा विडाच उचलला आहे आणि खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली याची माहिती या शेतकऱ्याला मिळाल्यावर त्यांनी पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांची भेट घेतली आणि घडलेली सर्व हकीकत नामदेवराव शिंदे यांना सांगितले यावरून पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी संबंधित सावकारास तुम्ही बारामती शहर पोलीस स्टेशन ला या चौकशी करायची आहे असा एक फोन केला आणि सावकारास पळता भुई थोडी झाली नामदेवराव शिंदे यांनी उगारलेला बडगा या सावकाराला चांगलाच माहिती असल्यामुळे त्यांनी संबंधित शेतकऱ्याचे घरी जाऊन पाय धरले व खुश खरेदी खताने घेतलेली दोन एकर जमीन मी पुन्हा तुमच्या नावावर करतो असे म्हणून ती जमीन आजच्या आज मूळ शेतकऱ्यास परतही केली व तक्रार करू नका म्हणून माफीही मागितली.
एकंदरीतच या प्रकारावरून पोलीस दलाच्या विषयी समाजात असलेली प्रतिमा उंचावत असून सामान्य माणसाला पोलिसांची मदत प्रिय वाटू लागली आहे आणि पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तेवढ्याच तत्परतेने शोषित ,पीडित लोकांना विश्वासात घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आजच्या घटनेवरून समाजात काही छुपे सावकार आहेत मात्र ते बिळातच आहेत असे दिसते पण ज्यावेळी हे सावकार बिळातून बाहेर येतील व सामान्य माणसाला दात दाखवतील त्यावेळी मात्र बारामती चा सिंघम आपला पंजा उगारणार यात तिळमात्र शंका नाही.
सावकारांना धडा शिकवणार
खाजगी सावकारी करून सामान्य जनतेला ,शेतकऱ्याला मेटाकुटीस आणून जर कोणताही सावकार धंदा करत असेल तर त्याला उघडं केल्याशिवाय पोलीस गप्प बसणार नाहीत सामान्य माणसाने कोणत्याही दहशतीला बळी न पडता पोलिसांकडे तक्रार द्यावी आम्ही सावकारांना अद्दल घडवू पण लोकांनी पुढे आलं पाहिजे
नामदेवराव शिंदे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन