दौंड

पाटस ता.दौंड येथून गावठी पिस्टल व २ काडतुसे जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

एक लाख अठरा हजार सहाशे) मुद्देमाल जप्त

पाटस ता.दौंड येथून गावठी पिस्टल व २ काडतुसे जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

एक लाख अठरा हजार सहाशे) मुद्देमाल जप्त

यवत;बारामती वार्तापत्र 

पाटस ता.दौंड जि.पुणे येथून एका सराईताकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी नव्याने पदभार घेतलेले पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे.

त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मार्गदर्शनाखाली विभागानुसार गुन्हे शाखेच्या पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलले गुन्हे शाखेतील सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महेश गायकवाड, निलेश कदम, विद्याधर निचित, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, काशिनाथ राजापुरे यांचे पथक सायंकाळचे सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पाटस चौक येथे आलेले असताना पथकास पाटस उड्डानपुल कानगाव रोड परिसरात एका लाल काळे रंगाचे पल्सर मोटरसायकल नंबर एमएच ४२ एएल ११३९ यावर एक इसम कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची माहीती एका खबऱ्याकडून मिळाली होती.

त्याप्रमाणे सदर पथकाने पाटस उड्डानपुल परिसरात खबरीतील वर्णनाप्रमाणे गाडीचा शोध घेतला असता पाटस उड्डान पुलाचे शेजारील सर्व्हीस रोडवर, बसस्टॉप समोर ता.दौंड जि.पुणे येथे पल्सर मोटरसायकल नंबर एमएच ४२ एएल ११३९ यावर एक इसम संशयास्पद रित्या थांबलेला दिसला.

पोलीसांनी तात्काळ त्यांची गाडी त्याचेसमोर आडवी लावून उतरून त्याचेजवळ जावू लागताच तो पळून जावू लागलेने त्यास घेराव घालून आरोपी लक्ष्मण उर्फ लखन दत्तात्रय सपकाळ वय ३५ रा.कानगाव, वरसगाव वस्ती, ता.दौंड जि.पुणे मूळ रा.वरसगाव गोरडवाडी ता.वेल्हा जि.पुणे यास जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव बाळगलेले एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर मिळून आलेले गावठी पिस्टल, २ काडतुसे, मोबाईल,
मोटरसायकल असा किंमत रुपये १,१८,६००/- चा (एक लाख अठरा हजार सहाशे) मुद्देमाल जप्त केलेला आहे.

आरोपी लक्ष्मण सपकाळ याने सदर गावठी पिस्टल दिपक उर्फ मोगल्या पासलकर याचेकडून घेतल्याचे सांगितलेने दोन्ही आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

आरोपी दिपक पासलकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी वेल्हा पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट याप्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपीस पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपीने सदरचे गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी आणले? त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का? त्याचा कोठे वापर केला आहे का? याबाबतचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!