पाणी जपून वापरा… नगरपालिकेकडून सोमवारपासून एक दिवसाआड पाणिपूरवठा.
तोट्या नसलेल्या नळाला तोट्या बसवून बसवून द्याव्यात

पाणी जपून वापरा… नगरपालिकेकडून सोमवारपासून एक दिवसाआड पाणिपूरवठा.
तोट्या नसलेल्या नळाला तोट्या बसवून बसवून द्याव्यात
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात सोमवार (दि. १२)पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगरपरिषदेकडून कळविण्यात आले आहे.
सोमवारी शहरातील विवेकानंदनगर,अवधूतनगर,वसंतनगर, व्हील कॉलनी,ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरुनगर, पतंगशानगर, महादेवमळा, अवचट इस्टेट, क्षत्रियनगर, श्रावण गल्ली, कोटी गल्ली, मारवाड पेठ, गोकुळवाडी, मेडद रोड आदी भागात, तसेच संपूर्ण कसबा, लक्ष्मीनारायणनगर, खंडोबानगर, सिकंदरनगर, मोरगाव रस्ता या भागात पाणीपुरवठा होईल.
मंगळवारी (दि. १३) सिनेमा रोड, कचेरी रोड, पान गल्ली, सटवाजीनगर, मुजावरवाडा, म्हाडा कॉलनी, गुणवडी रोड, समर्थनगर, देवळे इस्टेट, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड रोड, संपूर्ण आमराई, हंबीर बोळ, हरिकृपानगर, सिद्धेश्वर गल्ली, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, भिगवण रोड, विद्यानगर, साईगणेशनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट रोड, आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हाउसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्ट रोड, तावरे बंगला परिसर, विश्राम सोसायटी, जवाहरनगर या भागात पाणीपुरवठा होईल. त्यानंतर दिवसाआड पाणी मिळेल.
नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, तोट्या नसलेल्या नळाला तोट्या बसवून बसवून द्याव्यात, फिल्टर पाण्याचा अपव्यय टाळावा,असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.