पाणी फाउंडेशनच्या वृक्षप्रेमींनी केली इंदापुरमध्ये हरित वारी.
ऑक्सीजन पार्कची केली पाहणी.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
शिरढोण ता. कोरेगांव. जि.सातारा येथील पाणी फाऊंडेशनचे वृक्षप्रेमी यांनी इंदापूर येथील शहा नर्सरी, अटल घन, कचरा डेपो येथे वृक्ष लागवडीतून झालेल्या हरित परिसराची, ऑक्सीजन पार्कची पाहणी केली.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि शहा नर्सरीचे विश्वस्त मुकुंद शहा यांच्या समवेत संजय शेडगे, सचिन जाधव, विजय खंडे, गणेश घोरपडे आणि आणि त्यांच्याबरोबर आलेल्या दहा ते बारा इतर सामाजिक वृक्षप्रेमी कार्यकर्ते यांनी या परिसराची पाहणी केली तसेच शिरढोण येथे वृक्षारोपण करणे साठी इंदापूर येथील शहा नर्सरी येथून लिंब,पिंपळ,बेहडा, काटे सावर,बहावा,विलयचीचींच,आंबा,कांचन व इतर विविध प्रकारच्या 600 झाडांची रोपे आपल्या गावी लावण्यासाठी घेतली. शहा नर्सरी या सामाजिक उपक्रमात झाडे जगवण्याच्या हमीवर मोफत रोपे देत असते.मुकुंद शहा यांनी झाडांबद्दल विविध प्रकारचे माहिती देऊन त्याचे पालन पोषण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
इंदापूर नगर परिषदेने टाऊन हॉलच्या पाठीमागील बाजूस गेल्या वर्षी 15 ऑगष्ट2019 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन केंद्र शासनाच्या अटल आनंद घनवन योजने (ओक्सिजन पार्क) अंतर्गत 20 गुंठे जमिनीवर दोन ते अडीच हजार वृक्ष लागवड करून त्यांचे व्यवस्थित पालन पोषण करून त्याची व्यवस्थित निगा राखून जोपासना केली आहे.तसेच कचरा प्रक्रिया केंद्र येथेही वरील प्रमाणे लागवड करून आज त्याठिकाणी एक छोटेखानी बगीचा तयार केला आहे.तेथील ओल्या कचऱ्यात आलेल्या व सापडलेल्या आंब्यांच्या कोया,चिंचोके ,रामफळ,सीताफळ,जांभूळ व इतर बियांपासून रोपे तयार करून छोटीसी रोप वाटिका तयार केली आहे.तसेच कचऱ्यात आलेल्या टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूंचा खुबीने वापर करून त्यात विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे.
संजय शेडगे आणि सचिन जाधव यांनी प्रतिक्रया देताना सांगितले की आम्ही ही इंदापूर नगरपरिषदेच्या या राबविलेल्या उपक्रमा प्रमाणे असाच उपक्रम आमच्या गावी नक्कीच राबवू. येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर येताना मनात असं वाटायचं तिथे गेल्यावर खूप दुर्गंधी असेल घाण असेल परंतु प्रत्यक्षात इथे आल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला कुठली दुर्गंधी ना कुठली घाण इथे छोटीशी बगीचा तयार केलेला आहे हे पाहून खूपच आश्चर्य वाटले आणि नगराध्यक्षा अंकिता शहा आणि येथील अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अभिमानही वाटला. आमच्या गावकर्यांमध्ये जनजागृती करून कचरा विलगीकरण करू, झाडे लावू झाडे जगवू.
इंदापूर नगर परिषदेच्या वतीने अल्ताफ पठाण, सहायक आरोग्य निरीक्षक अशोक चिंचकर,लिलाचंद पोळ व अटल घन येथील झाडांचे निगा राखणारे चंद्रकांत शिंदे यांनी या ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची व झाडांबद्दल माहिती दिली.