पार्थ पवार फाउंडेशनची सणसरकरांना मदत
धान्य व गृहपयोगी वस्तूंचे केले वाटप.
बारामती वार्तापत्र
अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतीपिकांचे, राहत्या घरांचे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेक नागरिकांची राहती घरे पाण्यात गेली संसार उघड्यावर आले,याच काळात इंदापूर तालुक्यातील सणसर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला, आलेल्या पुरात सणसर येथील अनेक गोरगरीब लोकांच्या घराचे नुकसान झाले, अनेक लोकांचे संपूर्ण संसार उध्वस्त झाले, घरे वाहून गेली यापूर्वी इतकी बिकट परिस्थिती सणसरवर कधीच आली नव्हती परंतु या मोठ्या प्रलयातून ही सामान्य गरीब जनतेला मदतीचा एक हात देण्याच्या उद्देशाने पार्थ पवार फाऊंडेशन च्या वतीने व ॲड.रणजीत निंबाळकर मित्र परिवार यांच्या उपस्थित सणसर येथील बाधीत कुटुंबांना धान्य व गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वेळी रोहित निंबाळकर, वैभव निंबाळकर, सुधाम खवळे, पप्पू चितारे,सुनिल भिसे, संग्राम खवळे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजीत निंबाळकर म्हणाले की झालेल्या अतिवृष्टी मध्ये सणसर या गावाची मोठी हानी झाली, अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरस्थिती ची पाहणी करून त्वरित नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
गोरगरिबांच्या चुली पेटाव्या या उद्देशाने पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून सणसर येथे नागरिकांना धान्य किट चे वाटप करण्यात आले.