आपला जिल्हा

पार्थ पवार मंगळवेढ्यातुन लढणार का

प्रदेशाध्यक्ष म्हणतात अशी कुठलीही चर्चा नाही

पार्थ पवार मंगळवेढ्यातुन लढणार का

प्रदेशाध्यक्ष म्हणतात अशी कुठलीही चर्चा नाही

बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरू आहे .

मंगळवेढ्या चे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना तिथून उमेदवारी देणे विषयी सोलापुरातील एका वृत्तपत्रांमध्ये याविषयीची बातमी आली होती. त्यावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

कर्जत जामखेड मतदार संघातून ज्याप्रमाणे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक लढवत निवडून आले. त्याचप्रमाणे पार्थ यांनादेखील मंगळवेढ्यातुन निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी चे तरुण कार्यकर्ते आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पार्थ यांच्या उमेदवारीवर अशी कोणतीही चर्चा नाही असे सांगितले.

Related Articles

Back to top button