पालखी महामार्गावरील वृक्षतोड तात्काळ थांबवा : स्वप्निल सावंत
तहसीलदारांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या निमित्ताने बारामती इंदापूर राज्य मार्गावर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे ती थांबवून त्या झाडांचे पुनर्रोपण करण्याची मागणी इंदापूर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली असून याबाबत तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
बारामती ते इंदापूर व इंदापूर ते अकलूज मार्गावर गेल्या कित्येक दशकांपासून पिंपळ, चिंच,वटवृक्ष, निंब अशी विविध झाडे उभी आहेत.ती तोडली गेल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो.त्यांची वाढ होण्याकरिता बराच कालावधी गेला आहे.त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी होणारी वृक्षांची कत्तल ताबडतोब थांबली पाहिजे.तसेच वृक्षतोड न करता वृक्षांचे पुनर्रोपण करावे असे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत या वेळी म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी,तालुका कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर,इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान,डॉ.संतोष होगले,भगवान पासगे,बापुसाहेब बोराटे,तुषार चिंचकर, महादेव लोंढे, समीर शेख आदी उपस्थित होते.