पावसाचे पाणी दवाखान्यात शिरल्याने कोट्यवधींच्या मशनरी बंद
राऊत हॉस्पिटल चे मोठे नुकसान.
बारामती वार्तापत्र
कोरोना महामारीच्या संकटानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर,बारामती,दौंड तालुक्यात अतिवृष्टी व वादळी पावसामुळे नागरिक व व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.पावसामुळे संपूर्ण इंदापूर शहर जलमय होवून पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.शहरातील नागरिकांच्या घरामध्ये ,दुकानामध्ये, रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे खाजगी व शासकीय मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे नुकसान झालेले आहे असे असले तरी इंदापूर शहरात मात्र ‘राउत हॉस्पिटल’ या खाजगी रुग्णालयाचे मोठे नुकसान झालेले असून कोट्यावधी किंमतीच्या मशनरिनमध्ये पाणी गेल्याने त्या बंद पडलेल्या आहेत, यामध्ये सिटीस्कॅन मशिन, डिजिटल एक्सरे मशीन, अत्याधुनिक सिटीस्कॅन मशिन यांसह अनेक तपासणी विभाग पाण्यात होते, विशेष बाब म्हणजे या दवाखान्यात वरील मजल्यावर कोरोना चेही पेशंट आहेत.