पिंपरी खुर्द – शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली मोहिते-पाटील यांची निवड
निवडीची घोषणा होताच समर्थकांनी केला जल्लोष
पिंपरी खुर्द – शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली मोहिते-पाटील यांची निवड
निवडीची घोषणा होताच समर्थकांनी केला जल्लोष
इंदापूर : प्रतिनिधी
पिंपरी खुर्द – शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली सुनील मोहिते-पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीच्यावेळी सर्व सदस्य हजर होते. उपसरपंच निवडीची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला.
प्रसंगी बोलताना वैशाली सुनील मोहिते-पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी खुर्द व शिरसोडी गावच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली.
नवनिर्वाचित उपसरपंचपदी वैशाली मोहिते-पाटील यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी नवनाथ रुपनवर, अक्षय कोकाटे, सचिन खामगळ, संजय देवकर, गोविंद पाडुळे, विठ्ठल महाडिक, सुभाष डरंगे, संजय देवकर, नानासाहेब भोईटे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.