पिंपळीत पद्मविभूषण शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त ३८१ ई श्रम कार्ड व १४ दिव्यांग स्वावलंबन कार्ड चे वाटप
"ई श्रम कार्ड" व चौदा "दिव्यांग स्वावलंबन कार्ड"(युआयडी कार्ड) काढण्यात आली होती.
पिंपळीत पद्मविभूषण शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त ३८१ ई श्रम कार्ड व १४ दिव्यांग स्वावलंबन कार्ड चे वाटप
“ई श्रम कार्ड” व चौदा “दिव्यांग स्वावलंबन कार्ड”(युआयडी कार्ड) काढण्यात आली होती.
बारामती वार्तापत्र
पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर व छत्रपती कारखाना संचालक संतोष ढवाण पाटील यांच्या माध्यमातून व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण पाटील यांच्या प्रयत्नातून पिंपळी-लिमटेक येथील नागरिकांना व्यवसायासाठी आवश्यक व विमा पॉलिसी व इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे करिता “ई श्रम कार्ड व स्वावलंबन कार्ड” काढण्यात आले होते.
पिंपळी लिमटेक गावातील व्यावसायिक, उद्योजक, बांधकाम व इतर रोजंदार मजूर यांचे एकूण तीनशे एक्क्याऐंशी “ई श्रम कार्ड” व चौदा “दिव्यांग स्वावलंबन कार्ड”(युआयडी कार्ड) काढण्यात आली होती. त्याचे वाटप पिंपळी जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात दि.१६ डिसेंबर रोजी बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन गावातील विविध उपक्रमांचा संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी आढावा दिला.
स्वागत सरपंच मंगल केसकर यांनी केले व तर आभार सदस्य आबासाहेब देवकाते यांनी मानले.सूत्रसंचालन महेश चौधरी यांनी केले.
याप्रसंगी बारामती पंचायत समिती दिव्यांग कक्षाचे अधिकारी संदीप शिंदे यांनी स्वावलंबन कार्ड संदर्भातील माहिती सविस्तरपणे माहिती दिली. तसेच दिव्यांग योजनांचा लाभ घेण्याचा आवाहन त्यांनी केले.
गावातील प्रत्येक गरजू नागरिकांना संजय गांधी तसेच शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाव्यात यासाठी बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे पक्षाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करत असतात तसेच आणि लोकोपयोगी उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत असतात त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत सरपंच मंगल केसकर यांनी व्यक्त करून पद्मविभूषण पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे पिंपळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शालेय विध्यार्थ्यांना गणवेश तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बापूराव केसकर यांचे वतीने वह्या वाटप उपक्रम घेण्यात आला होता.त्याचेही वाटप चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार,संचालक संतोष ढवाण,सरपंच मंगल केसकर,उपसरपंच राहुल बनकर,बारामती तालुका सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,सदस्य आबासाहेब देवकाते, अजित थोरात,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, ग्रामपंचायत लिपिक अनिल बनकर व कर्मचारी,गणेश सीएससी सेन्टर चे आदित्य पाटोळे, पिंपळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक केशव आगवणे सर,शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी-विध्यार्थीनी तसेच ग्रामस्थ अशोकराव ढवाण,हरिभाऊ केसकर, महेश चौधरी,उत्तम मदने,अशोकराव देवकाते, अशोक थोरात,नितीन देवकाते,धनाजी जाधव,लालासो चांडे, विलास ठेंगल,नंदकुमार बाबर,हरी यादव,नितीन काटे,अनिल भोसले बाळासाहेब तांबे तसेच लाभार्थी,युवक,महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.