पिंपळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमीपुंजन बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न
पिंपळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना सुसज्ज असे खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना

पिंपळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमीपुंजन बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न
पिंपळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना सुसज्ज असे खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फंडातून व तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या माध्यमातून आणि संचालक संतोषराव ढवाण पाटील आणि सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांचे प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पिंपळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा भूमिपुंजन समारंभ बारामती ॲग्रो’चे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते नारळ फोडून व भूमीपुंजन करून संपन्न झाला.
तसेच छत्रपती सह.कारखाना संचालक संतोषराव ढवाण-पाटील, पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल हरीभाऊ केसकर,उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील, तालुका राष्ट्रवादी सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,बारामती तालुका शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष विकास बाबर,अशोकराव ढवाण-पाटील,ग्रामपंचायत मा.उपसरपंच राहुल बनकर,सदस्य अजित थोरात बारामती तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विजय बाबर,बापूराव केसकर, पिंपळी-लिमटेक विविध विकास सोसायटीचे संचालक अशोकराव देवकाते-पाटील,श्रीराम सोसायटीचे महेश चौधरी,हरिभाऊ केसकर यांच्या हस्ते पाया खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना राजेंद्र पवार यांनी इमारतीचे काम दर्जेदार करण्यात यावे.गाव विकासाची कामे करताना सर्वांना विश्वासात घेऊन करा,नेते भरघोस निधी उपलब्ध करून देत असतात. गावातील रस्ते देखील झाले पाहिजेत,चांगल्या रस्त्यांमुळे विकासास गती मिळते. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून रस्त्यावरील अतिक्रमणे स्व.इच्छेने काढून गाव हितास प्राधान्य द्यावे.पिंपळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना सुसज्ज असे खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान संरक्षक भिंतीसह उपलब्ध करून द्यावे व गाव आणि वाड्या वस्त्यांवरील रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढून वृक्षारोपण करण्यात यावे असे मत शेतकरी विकास बाबर यांनी व्यक्त केले.शाळेचे मैदान व ग्रामपंचायतीच्या इमारतीचा समतोल राखण्यात यावा असे मत अशोकराव देवकाते यांनी व्यक्त केले.
सर्वांना सोबत घेऊन गाव विकासाची कामे करू तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचे माध्यमातून रस्ते व इमारतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. त्यानिधीचा योग्य पद्धतीने वापर करून दर्जेदार नेत्यांना अपेक्षित अशी कामे करून घेऊ तसेच शाळेसाठी लवकरच सुसज्ज असे खेळाचे मैदान उपलब्ध करून देऊ असे आश्वासन संचालक ढवाण पाटील यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसरपंच आबासाहेब देवकाते यांनी केले.यावेळी राजेंद्र पवार, संतोष ढवाण-पाटील, मंगल केसकर, आबासाहेब देवकाते पाटील,अशोक देवकाते-पाटील, अशोक ढवाण-पाटील,हरिभाऊ केसकर,सुनिल बनसोडे, विकास बाबर,राहुल बनकर, अजित थोरात,महेश चौधरी, विजय बाबर,बापूराव केसकर,पद्मकांत निकम, हनुमंत कुदळे,अनिल बनकर,धनाजी जाधव,सचिन केसकर,आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत सरपंच मंगल केसकर यांनी केले तर आभार अशोकराव ढवाण व सुनिल बनसोडे यांनी मानले.